नऱ्हेत हॉटेल व्यावसायिक खुनप्रकरणी दोघे अटकेत
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) – नऱ्हेत हॉटेल व्यावसायिकाचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी दोघांना पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने अटक केले आहे.
संतोष रामचंद्र नाक्ती (वय २८, रा. गावडदरा, ता. हवेली) आणि सुधीर राजाराम कामठे (वय २४, रा. कुसगाव ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुनील लांगोरे (वय ४०) असे खून झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे.





