Accident News : नवापूरमध्ये ट्रक-बसची धडक; 7 जण गंभीर जखमी
Updated On:

नंदुरबार – नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटामध्ये दोन ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त बस जामनेरहून सुरतकडे जात होती. जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे.
घटनास्थळी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पथक दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात पाठवण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.





