Nashik Tapovan | नाशिकच्या तपोवनमध्ये पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून ही वृक्षतोड करण्यात येत आहे. 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींसह काही राजकीय नेते मंडळी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला ठामपण विरोध केला आहे. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. येथील वृक्ष तोडण्यास विरोध केलेला असताना देखील सरकारकडून आजपासून वृक्षतोड करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एसटीपी प्लांट उभारण्यात येणार आहे. तपोवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमींनी केलेल्या आरोपानुसार, 300 पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आली असल्याने तपोवन परिसरात उभारला जाणारा नवीन एसटीपी प्लांट वादात सापडला आहे. Nashik Tapovan | दरम्यान, 447 झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. साधुग्राम परिसरातील 1800 झाडांचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नसताना, नवीन एसटीपी प्लांटसाठी झाडांची तोड करण्यात आली, असा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या प्रकल्पासाठी 447 झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याची अधिकृत नोटीस देण्यात आली होती. त्यातील 300 झाडे तोडण्यात आली असून उर्वरित झाडे वाचवण्यात आली, असा दावा प्रशासनाने केला आहे. Nashik Tapovan | 15 हजार देशी झाडे निवडल्याची कबुली दरम्यान, कुंभमेळ्याची जबाबदारी असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुद्री येथे जाऊन 15 फुटांची तब्बल 15 हजार देशी झाडे निवडल्याची कबुली दिली. राजमुद्री येथून जी झाडे आणली जाणार आहेत त्यात पिंपळ, वड, जांभूळ, आंबा, लिंबू यांचा समावेश आहे. नाशिक शहरातील पेलीकन पार्क येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी नियोजित जागेची मी पाहणी केली. या जागेसह शहरातील इतरही अनेक ठिकाणी लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असल्याचेही महाजन यांनी सांगितले आहे. Nashik Tapovan | हेही वाचा : महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील वाद पुन्हा समोर; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा दावा