‘विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, ठाकरे आणि शरद पवार गटाला एकही जागा…”; गिरीश महाजनांचे विधान

Girish Mahajan | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये देखील इनकमिंग सुरू झाले आहे. अनेक नेते पदाधिकारी भाजपात प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान आता भाजप नेते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार आहोत. मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. एकही नगरपालिका जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळता कामा नये. विरोधकांची तोडं बंद करा आणि त्यांना आपल्याकडे घ्या. कोणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका.” Girish Mahajan |
कार्यकर्ता छोटा असला तरी त्याला पक्षात घ्या
“दुसऱ्या पक्षातला नेता, कार्यकर्ता कसाही असूद्या पण कामाचा माणूस आहे. कितीतरी लोक आपल्यावर टीका करणारे होते पण आज ते आपल्याकडे आले आहे. जो या पक्षामध्ये काम करेल त्याला पक्षात किंमत आहे. फक्त फोटोबाजी करणाऱ्याला किंमत नाही. कार्यकर्ता छोटा जरी असला तरी त्याला पक्षात घ्या, त्याचे स्वागत करा,” असा सल्ला गिरीश महाजन यांनी भाजप पदधिकाऱ्यांना दिला आहे. Girish Mahajan |
गिरीश महाजन हे भाजपचे बड नेते समजले जातात. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं
आहे. दरम्यान, महाजन यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील सत्ता समीकरणात वेगळा बदल दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :





