खंबाटकी घाटात ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत
Updated On:

खंडाळा – पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर पुण्याहून साताऱ्याला येताना खंबाटकी घाटाचा उतारावर अवजड स्टील घेऊन जाणारा मालट्रक एका धोकादायक वळणावर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई येथून निघालेला आणि जयसिंगपूर येथे स्टीलच्या प्लेट्स नेणारा हा ट्रक (MH16-CA-7077) चालकास वळणाचा अंदाज न आल्याने उलटला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील ट्रक मधील प्लेट्स विखुरल्या आणि इंजिन ऑइल रस्त्यावर सांडले होते त्यामुळे एकाच मार्गिकेधून वाहतूक नियंत्रित करण्यात आली. या अपघातात जीवितहानी झालेली नसून वाहनचालकास किरकोळ जखम झाली आहे.





