मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत बदल; पनवेल एक्झिट 6 महिन्यांसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Pune Expressway | जर तुम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.
कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता ?
- यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (कि.मी. 9.600) येथे डावीकडे वळण घेऊन एनएच 48 मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे.
- तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून (पनेवल एक्झीट) येथून तळोजा, कल्याण-शिळफाटयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरून पुरूषार्थ पेट्रोलपंप उड्डाण पुलाखालून उजवीकडे वळण घेवून रोडपाली येथून एन.एच 48 महामार्गावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. Mumbai-Pune Expressway |
पनवेल एक्झिट बंद राहणार असल्याने लहान आणि मोठी वाहने तसेच मालवाहू ट्रक यांना याचा अधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः पनवेल, मुंब्रा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे जाणाऱ्या वाहनांना फटका बसणार आहे. त्यादृष्टीने वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सूचविले आहेत. Mumbai-Pune Expressway |
हेही वाचा:





