Munmun Dutta : समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी; अभिनेत्री मुनमुन दत्ताने व्यक्त केला संताप
Munmun Dutta :

Munmun Dutta : अभिनेत्री मुनमुन दत्ताला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यातील तिच्या बबीता या भूमिकेला मोठी पसंती मिळाली.
सध्या मुनमुन तिच्या भूमिकांमुळेच नाही, तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मुनमुनने नुकताच लोकप्रिय पर्यटन स्थळी काही भारतीय पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला.
मुनमुन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, काही भारतीय असं काही वर्तन करताना दिसत आहेत, जे लाजिरवाणं आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील लाज वाटेल. शिवाय काही जण नैसर्गिक स्थळे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असल्याचं देखील चित्र दिसत आहे.
लोकप्रिय पर्यटन स्थळांवर हे लज्जास्पद वर्तन घडत आहे. काही पुरुष पर्यटन स्थळी अर्धनग्न फिरत आहेत, तर काही पुरुष समुद्रात कार चालवत आहेत, हे सर्व पाहिल्यानंतर मुनमुन दत्ताला प्रचंड राग आला.
मुनमुन दत्ता निसर्ग आणि प्राण्यांवर खूप प्रेम करते. ती नेहमीच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या बाजूने असते. नुकताच तिने तिच्या ‘मॉर्निंग रुटीन’चा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिने वाचवलेल्या एका मांजरीच्या पिल्लाची ओळख चाहत्यांशी करून दिली होती.
या व्हिडिओमध्ये ती मांजरीच्या पिल्लाशी लाडाने बोलताना दिसत आहे. “काय झालं बाळा, तुला माहिती हवी आहे का? चला, आपण मेकअप सुरू करूय, हे आपलं नवीन रेस्क्यू आहे,” असं ती त्या पिल्लाला म्हणताना ऐकू येत आहे.
दरम्यान, मुनमुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे दैनंदिन अपडेट्स नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.
हेही वाचा:






