Tanmay Vekaria : “बाघा भूमिकेमुळे आता सरळ उभे राहणेही अवघड”; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्याचा खुलासा
Tanmay Vekaria : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील बाघा हे सर्वाधिक लोकप्रिय पात्रांपैकी मानले जाते

Tanmay Vekaria : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘बाघा’ भूमिकेचे अनेकांकडून कौतुक केले जाते. अभिनेता तन्मय वेकारियाने ही भूमिका साकारली आहे. मात्र या भूमिकेबाबत तन्मयने मोठा खुलासा केला आहे. गेली अनेक वर्ष बाघाची भूमिका साकारल्यामुळे त्याच्या पाठीच्या गंभीर त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एका मुलाखतीत तन्मय वेकारियाने सांगितले की, बाघा हे पात्र सुरुवातीपासूनच थोडे वाकून चालणारे आणि उभे राहणारे दाखवण्यात आले आहे. या भूमिकेची ओळखच त्याच्या खास बॉडी लँग्वेजमुळे निर्माण झाली. मात्र, वर्षानुवर्षे सतत त्याच पद्धतीने अभिनय केल्यामुळे आता माझ्या पाठीवर त्याचा परिणाम झाला आहे.
तो म्हणाले की, आता बराच वेळ सरळ उभे राहणेही अवघड वाटते. पाठीमध्ये सतत वेदना जाणवतात आणि अनेकदा शूटिंगदरम्यानही त्रास सहन करावा लागतो. तरीही प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आणि पात्रावरील निष्ठेमुळे मी ही भूमिका तितक्याच उत्साहाने साकारत आहेत. Tanmay Vekaria
तन्मयने पुढे सांगितले की, अभिनय करताना अनेक कलाकारांना त्यांच्या भूमिकेनुसार शारीरिक बदल स्वीकारावे लागतात. काही वेळा वजन वाढवावे किंवा कमी करावे लागते, तर काही वेळा विशिष्ट चालण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत अंगीकारावी लागते. अशा गोष्टींचा शरीरावर कालांतराने परिणाम होऊ शकतो.
पण तरीही मला हे पात्र साकारायला आजही तितकेच आवडते. एकदा मी कॅमेऱ्यासमोर भूमिका करताना या पात्रात शिरलो, की मला वेदना किंवा इतर कशाचीही जाणीव होत नाही. मी फक्त माझ्या कामाचा आनंद घेतो. मी रोज आनंदाने सेटवर येतो आणि काम करतो. याच कारणामुळे आम्ही प्रेक्षकांसाठी चांगले एपिसोड्स बनवू शकतो”, असेही तन्मय वेकारियाने सांगितले. Tanmay Vekaria
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली असून बाघा हे त्यातील सर्वाधिक लोकप्रिय पात्रांपैकी एक मानले जाते.
हेही वाचा:
Party joins the BJP : “भाजपमध्ये ‘हा’ पक्ष विलीन होणार” ; राजकारणात एकच खळबळ





