Shashi Tharoor: “आज जे पाहिले ते अतिशय लाजिरवाणे आणि अमानुष”; दिल्लीतील कडक बंदोबस्तावरून शशी थरूर यांची रोखठोक प्रतिक्रिया
Shashi Tharoor: 'राजधानीत जेव्हा महिलांना सुरक्षेची गरज असते, तेव्हा ही असाधारण जनशक्ती आणि तत्परता कुठे गायब होते?'

Shashi Tharoor: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (SIR) विरोध, मतदारांची नावे कथितरीत्या वगळण्यात आल्याचा आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र हे आंदोलन होण्यापूर्वी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॅाकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी थेट विमानातून ताब्यात घेतले. तसेच CJP ने जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली.
याशिवाय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले असून, आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. तसेच येथील इंटरनेट सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शशी थरूर यांची पोस्ट –
शशी थरूर यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, “मी रात्री २ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय राजधानीत परतलो आणि दिल्लीत जी परिस्थिती पाहिली, तशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. प्रत्येक काहीशे मीटरवर चौक्या उभारण्यात आल्या आहेत, रस्त्यांवर सिमेंटचे बॅरिकेड्स आणि स्पाइक स्ट्रिप्स (लोखंडी खिळ्यांचे पट्टे) पसरवले आहेत, संपूर्ण शहरात २२,००० पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दलांची युद्धसदृश तैनाती करण्यात आली आहे, २५० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून ४५ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.
दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील तरुणांना त्यांच्या घरातून आणि रस्त्यांवरून ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत हे सर्व नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने निवडणुकांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखण्यासाठी केले जात आहे. सर्वात प्रतिगामी पाऊल म्हणजे राष्ट्रीय राजधानीच्या मध्यभागी इंटरनेट बंद करणे हे आहे.”
I returned to the national capital after 2 am and have rarely seen anything like what Delhi is witnessing now, with checkpoints every few hundred metres, concrete barriers and spike strips laid across our roads, a war-like deployment of 22,000 police and paramilitary across the city, 250 trains cancelled and 45 metro stations closed, and reports of young people being detained from their own homes and the streets in and around Delhi — all to prevent citizens from peacefully raising questions about the integrity of our elections. Most regressive (as well as repressive) is the suspension of the internet in the heart of the national capital.
Freedom of movement stands completely shackled. Jantar Mantar was designated precisely so that citizens could voice dissent in the centre of Delhi, and today even the roads leading to it have been declared out of bounds. One is entitled to ask where this extraordinary manpower and urgency disappear when women in our capital need protection.
Those detained will hvre to be released .And if the protesters simply return on Monday, will the authorities lock down the national capital all over again? Our GenZ deserves better than an undeclared Emer-GenZ.
A government confident in the fairness of its elections would welcome questions about them, whereas one that turns its capital into a fortress to avoid them only deepens the very suspicions it seeks to suppress. The government should provide answers, not lathis; expression, not repression.
Barricades will do nothing to restore faith in the Election Commission, and the sooner it answers the public’s questions, the sooner calm will be restored. The strength of a democracy is measured by how it treats those who question its working, and by that measure, what we have seen today is utterly shameful and unconscionable.
https://t.co/C3jkLU1dm1 @INCIndia— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 10, 2026
जनशक्ती आणि तत्परता कुठे गायब होते?
पुढे त्यांनी लिहिले, “एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे ठप्प झाले आहे. जंतर-मंतरची स्थापना नेमकी याच उद्देशासाठी करण्यात आली होती की, नागरिकांनी दिल्लीच्या मध्यभागी आपली सहमती दर्शवावी किंवा विरोध नोंदवावा आणि आज तर तिथे जाणाऱ्या रस्त्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. आपल्या राजधानीत जेव्हा महिलांना सुरक्षेची गरज असते, तेव्हा ही असाधारण जनशक्ती आणि तत्परता कुठे गायब होते, हा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो.
अटक केलेल्या लोकांना मुक्त करावेच लागेल. जर आंदोलक सोमवारी पुन्हा परतले, तर अधिकारी राजधानीला पुन्हा एकदा बंद करतील का? आपल्या पिढीला एका अघोषित उदयास येणाऱ्या व्यवस्थेपेक्षा अधिक चांगली व्यवस्था मिळायला हवी. निवडणुकांच्या निष्पक्षतेवर विश्वास असणारी सरकारे त्यांचे स्वागत करतात, तर राजधानीला किल्ल्यामध्ये बदलणारे सरकार केवळ त्या संशयांना अधिक गढूळ करते ज्यांना ते दाबू इच्छित आहेत. सरकारने लाठीचार्ज न करता उत्तरे दिली पाहिजेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले पाहिजे.
बॅरिकेड्स लावल्याने निवडणूक आयोगावरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होणार नाही आणि आयोग जितक्या लवकर जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देईल. तितक्या लवकर शांतता प्रस्थापित होईल. लोकशाहीची ताकद यावरून मोजली जाते की, ती तिच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांशी कसा व्यवहार करते आणि या निकषावर आज आपण जे पाहिले ते अतिशय लाजिरवाणे आणि अमानुष आहे,” असे म्हणत शशी थरुर यांनी मोदी सरकरावर टीका केली आहे.
हेही वाचा:
Misal Pav: झणझणीत कट, कुरकुरीत फरसाण अन् मऊ पाव! घरच्या घरी बनवा अस्सल गावरान स्टाईल मिसळ





