Jantar Mantar Protest: अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात
Jantar Mantar Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

Jantar Mantar Protest: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
CJPचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही मुंबईहून दिल्लीला पोहोचल्यानंतर विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
VIDEO | Delhi: AAP National Convenor Arvind Kejriwal detained during protest against CEC Gyanesh Kumar.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – ptivideos – https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/pwiC8Tup30
— Press Trust of India (@PTI_News) October 10, 2026
केजरीवाल यांनी शुक्रवारी आपण कुटुंबासह जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. तसेच देशातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनादरम्यान आपचे नेते गोपाल राय यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे काही खासदार, माकपचे महासचिव एम. ए. बेबी, ज्येष्ठ नेत्या वृंदा करात आणि इतर काही नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.





