Sonam Wangchuk : दिल्लीतील आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार नाहीत; व्हिडिओ शेअर करत सांगितले कारण
Sonam Wangchuk : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Sonam Wangchuk : कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत जंतर-मंतरवर आज 10 ऑक्टोबर 2026 रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आणि SIR प्रक्रियेतील घोळाच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होतं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर-मंतरवर 2.0ची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी होणार नाहीत.
याआधी जंतर-मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जे आंदोलन झालं होतं, त्यावेळी अभिजीत दिपकेंसह सोनम वांगचुक देखील सहभागी झाली होते. स्वत: सोनम वांगचुक यांनी उपोषण करत विद्यार्थांसोबत उभे राहिले होते. आताच्या आंदोलनात मात्र वांगचुक नसणार आहे, याबाबतचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले सोनम वांगचुक?
सोनम वांगचुक यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की, “मी सध्या लडाखच्या डोंगर रांगामध्ये उभा आहे. आमच्या कार्यात अडथळे आणण्याचे आणि ते मोडून काढण्याचे सरकारचे सर्व प्रयत्न असूनही, आम्ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करत आहोत. हिवाळ्याच्या आगमनापूर्वीची तयारी करत आहोत. यात पाण्याच्या सुरक्षेसाठी कृत्रिम हिमनद्या तयार करणे आणि उंच हिमालयातील 200 हून अधिक धोकादायक ‘टिकिंग वॉटर बॉम्ब’चा धोका कमी करण्यासाठी हिमनदीच्या सरोवरातून अचानक येणाऱ्या पुराचा धोका समजून घेण्यासाठी प्रयोग करणे यांचा समावेश आहे.
WHY I WON’T BE ABLE TO JOIN YOU ALL IN DELHI…!
Despite all efforts of the government to hinder & damage our work we continue to work for national security… making preparations as another winter comes.
This includes making artificial glaciers for water security & experiments for GLOF or glacial lake flood security… to difuse the 200+ ticking water bombs in high Himalayas.
Adapting Faiz Sahab’s words I would say…
Aur Bhi Gham Hain Zamaane Main Siyaast Ke Siva…
Rahaten aur bhi hain wasl ki raahat ke siva.Hence I send my bestest wishes to all & urge the leaders of different groups to stay united & show statesmanship, meanwhile I urge all the genZ friends to once again stay absolutely peaceful at all costs. This was the gift of Baapu that I tried to bring to Jantar Mantar in June,
I hope we won’t let Baapu down.
#JantarMantar #protest #CJP #CEC #sonamwangchuk— Sonam Wangchuk (@Wangchuk66) October 9, 2026
यादरम्यान दिल्लीतल्या संघर्षात मी का नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. मी दाद देतो दिल्लीत जमलेल्या सगळ्या तरूणांना जे राजकीय संकटाच्या विरोधात उभे राहिले आहेत आणि त्यांची एकजूट त्यांनी दाखवून दिली आहे. पण राजकीय संकटांप्रमाणेच नैसर्गिक संकटंही येत आहेत. फैज यांच्या अंदाजात सांगायचं झालं तर, ‘जगात राजकारणाव्यतिरिक्त इतरही दुःखे आहेत, संघराज्याच्या समाधानाव्यतिरिक्त इतरही दुःखे आहेत.’ सध्या जी मदत हवी आहे, दिलासा हवा आहे तो नैसर्गिक संकटांपासूनही हवा आहे त्यामुळे मी आंदोलनात आलो नाही,” असं सोनम वांगचुक म्हणाले.
जेन-झीला आवाहन
पुढे सोनम वांगचुक पुढे म्हणाले, “आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांना मी सर्वांना माझ्या शुभेच्छा पाठवतो आणि विविध गटांच्या नेत्यांना एकजूट राहण्याचे आणि सामंजस्य राखण्याचे आवाहन करतो. मी जेन-झी मधील माझ्या सर्व मित्रांनाही सर्व परिस्थितीत पूर्ण शांतता राखण्याचे आवाहन करतो. ही बापूंकडून मिळालेली एक भेट होती, जी मी जूनमध्ये जंतर मंतरवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो. मला आशा आहे की आपण बापूंना निराश करणार नाहीत. मी त्या आंदोलनात सहभागी झालो होतो आता मला या ठिकाणी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक समस्यांना तोंड द्यायचं आहे. पण माझ्या शुभेच्छा कायमच तुमच्या पाठिशी आहेत.”
दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले असून, आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. तसेच देशाच्या विविध भागांतून दिल्लीकडे येणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या कारणांमुळे हे निर्णय घेण्यात आला आहे. तर ५०० आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
हेही वाचा:





