Kohli Head Controversy : हायव्होल्टेज सामन्यानंतर विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडशी हात मिळवणं का टाळलं? नेमक काय घडलं होतं? पाहा VIDEO
Kohli Head Controversy : हेडने हात पुढे केला असूनही कोहली त्याच्याशी हात न मिळवता थेट पुढे निघून गेला. या मागे कारण काय होतं? जाणून घ्या

Virat Kohli Travis Head Handshake Controversy : आयपीएल २०२६ (IPL2026) मधील सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढत संपल्यानंतर मैदानावर एक असा प्रकार घडला, ज्याने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू परंपरेनुसार एकमेकांशी हात मिळवत (हँडशेक) असताना, विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडला पूर्णपणे दुर्लक्षित केले. हेडने हात पुढे केला असूनही कोहली त्याच्याशी हात न मिळवता थेट पुढे निघून गेला. मैदानातील वादानंतरचा हा व्हिडीओ आता वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
मैदानात नक्की काय घडलं होतं? (Kohli Head Controversy)
सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करत असताना ट्रॅव्हिस हेडची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli ) आक्रमकपणे जल्लोष केला, तेव्हा या संपूर्ण वादाला सुरुवात झाली. यानंतर आरसीबीच्या डावादरम्यान, ट्रॅव्हिस हेडने विराटला आक्रमक फटके खेळण्यासाठी चिथावणी दिल्यावर परिस्थिती आणखी चिघळली. त्यांच्यात बाचाबाचीसुद्धा झाली. त्यानंतर शिवांग कुमारच्या षटकात जेव्हा धावा वेगाने निघत होत्या, तेव्हा विराटने उत्तर दिले की, बोलण्याऐवजी हेडने त्याला गोलंदाजी करून आपले नशीब आजमावावे.
Virat Kohli didn’t shake hands with Travis Head after the match ended. pic.twitter.com/74UEXm1aUV
— Cricketopia (@CricketopiaCom) May 22, 2026
यानंततर ट्रॅव्हिस हेड गोलंदाजीसाठी आला, पण तोपर्यंत विराट ११ चेंडूंमध्ये १५ धावांवर बाद झाला होता. ट्रॅव्हिस हेडला आपल्या गोलंदाजीत यशही मिळाले आणि त्याने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारची विकेट घेतली. यापूर्वी हैदराबादच्या फलंदाजीदरम्यान जेव्हा रसिक सलाम डारने ट्रॅव्हिस हेडला एका शानदार यॉर्करवर बोल्ड केले, तेव्हा देखील विराटने अतिशय आक्रमक अंदाजात जल्लोष केला होता. या सामन्यात विराटची बॅट चालली नाही आणि तो अवघ्या १५ धावांवर साकिब हुसैनच्या चेंडूवर बाद झाला.
#ViratKohli 🆚 #TravisHead 🥵🤯
Tensions rise in high voltage clash🔥#TATAIPL Race to Playoffs 2026 👉 #SRHvRCB | LIVE NOW ➡️https://t.co/52qPTW2gSO pic.twitter.com/JOiWaxNW6T
— Star Sports (@StarSportsIndia) May 22, 2026
विजयानंतरही हैदराबादचे नुकसान, आरसीबी टॉप-२ मध्ये! (Kohli Head Controversy)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने अभिषेक शर्माच्या ५६, इशान किशनच्या ७९ आणि हेनरिक क्लासेनच्या ५१ धावांच्या जोरावर ४ बाद २५५ धावा कुटल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल आरसीबीचा संघ २०० धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि हैदराबादने हा सामना ५५ धावांनी जिंकला.
हेही वाचा – SRH vs RCB : सनरायझर्स हैदराबादचा आरसीबीवर ५५ धावांनी विजय, पण एका चुकीमुळे हुकलं ‘क्वालिफायर १’ चं तिकीट
मात्र, हा सामना हरूनही आरसीबीचे (RCB) मोठे नुकसान झाले नाही. चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली आणि गुजरात टायटन्ससोबत त्यांनी टॉप-२ मध्ये स्थान पक्के केले. आता २६ मे रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या ‘क्वालिफायर-१’ मध्ये आरसीबी आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असतील. परंतु, सध्या या सामन्यापेक्षा विराट आणि हेडमधील वादाचीच क्रीडा वर्तुळात जास्त चर्चा रंगली आहे. (Kohli Head Controversy)





