Axar Patel Fixing Allegations : अक्षर पटेलने मुद्दाम सोडला सोपा कॅच? सोशल मीडियावर फिक्सिंगच्या चर्चांना उधाण; नेमकं सत्य काय? पाहा VIDEO
Axar Patel Fixing Allegations : एक व्हिडिओमध्ये अक्षर पटेल समोर आलेला एक अत्यंत सोपा झेल पकडण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाही.

Axar Patel faces fixing allegations after dropping a catch : आयपीएल २०२६ च्या ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर ३ गड्यांनी मात करत प्लेऑफ्सच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. धर्मशाला येथील या मैदानात दिल्लीने विजय तर मिळवला, पण कर्णधार अक्षर पटेल एका वेगळ्याच वादामुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. मैदानावरील त्याच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर तो ‘व्हिलन’ ठरला असून त्याच्यावर फिक्सिंगचेही आरोप केले जात आहेत.
कॅच सोडला की ‘फिक्सिंग’? सोशल मीडियावर संताप
पंजाब किंग्सच्या फलंदाजीदरम्यानचा अक्षर पटेलचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अक्षर पटेल समोर आलेला एक अत्यंत सोपा झेल पकडण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाही. त्याने इतक्या सहजतेने झेल सोडलेला पाहून चाहते अवाक झाले आणि नेटिझन्सनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. अनेक युजर्सनी हा प्रकार संशयास्पद असल्याचे सांगत अक्षर पटेलवर ‘फिक्सिंग’ केल्याचा खळबळजनक आरोप केला.
No way Axar Patel didn’t even try to catch such an easy catch.
Something about the IPL genuinely feels scripted nowadays.🤐 pic.twitter.com/Dh6YvflHoJ
— Abhishek Kumar (@Abhishek060722) May 11, 2026
सत्य समोर आल्यावर चाहत्यांची झाली बोलती बंद!
Why did Axar Patel drop the catch? He didn’t even attempt it. He could have easily caught the ball.
He is one of the best fielder. Match fixing 😱 pic.twitter.com/708RyRFH0Q
— VIKAS (@Vikas662005) May 12, 2026
सोशल मीडियावर हे प्रकरण तापल्यानंतर जेव्हा या घटनेचा अधिक तपास करण्यात आला, तेव्हा खरी वस्तुस्थिती समोर आली. ज्या चेंडूवर अक्षरने झेल सोडला होता, तो मुळात ‘फ्री हिट’ चेंडू होता. दिल्लीच्या गोलंदाजाने त्यापूर्वीचा चेंडू नो-बॉल टाकला होता. क्रिकेटच्या नियमानुसार, फ्री हिटवर फलंदाज कॅच आऊट होऊ शकत नाही. त्यामुळेच अक्षर पटेलने त्या चेंडूवर झेल पकडण्यात कोणताही रस दाखवला नाही.
बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड –
जरी कॅच प्रकरणातून अक्षर पटेलची सुटका झाली असली, तरी शिस्तीच्या बाबतीत त्याला बीसीसीआयच्या रोषाला सामोरे जावे लागले. पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही. या ‘स्लो ओव्हर रेट’ मुळे बीसीसीआयने अक्षर पटेलवर १२ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. या हंगामातील दिल्लीची ही पहिलीच चूक असल्याने त्याला हा किमान दंड सोसावा लागला आहे.





