SRH World Record : सनरायझर्स हैदराबादचा वर्ल्ड रेकॉर्ड! आयपीएलच्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
SRH World Record : सनरायझर्स हैदरबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला आहे.

SRH Powerplay World Record IPL 2026 : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील १७ व्या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीने पूर्णपणे चुकीचा ठरवला. सामन्याच्या पहिल्या षटकापासूनच या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. अभिषेक शर्माने अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून पंजाबच्या गोटात घबराट निर्माण केली. यासह हैदराबादने एक खास इतिहासही रचला.
पॉवरप्लेमध्ये तीनदा पार केली शंभरी – SRH World Record
सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात पहिल्या ६ षटकांत बिनबाद १०५ धावा कुटल्या. आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये १०० पेक्षा जास्त धावा करण्याची हैदराबादची ही तिसरी वेळ आहे. जगातील इतर कोणत्याही टी-२० संघाला ही कामगिरी एकपेक्षा जास्त वेळा करता आलेली नाही. यापूर्वी २०२४ मध्ये दिल्लीविरुद्ध १२५ आणि लखनऊविरुद्ध १०७ धावा हैदराबादने पॉवरप्लेमध्ये केल्या होत्या. ज्यामुळे हैदराबादच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.
This form of brotherhood 🤩🔥 pic.twitter.com/Tm6DjzN3u4
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 11, 2026
आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये १०० पेक्षा जास्त धावा करणारे संघ: SRH World Record
- १२५/० – एसआरएच विरुद्ध डीसी, दिल्ली, २०२४
- १०७/० – एसआरएच विरुद्ध एलएसजी, हैदराबाद, २०२४
- १०५/० – एसआरएच विरुद्ध पीबीकेएस, मुल्लानपूर, २०२६
- १०५/० – केकेआर विरुद्ध आरसीबी, बंगळूर, २०१७
- १००/२ – सीएसके विरुद्ध पीबीकेएस, मुंबई डब्ल्यूएस, २०१४
अर्शदीप सिंगला अभिषेकने धुवून काढलं – SRH World Record
पंजाबचा मुख्य गोलंदाज अर्शदीप सिंग या सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरला. डावाच्या तिसऱ्या षटकात अभिषेक शर्माने त्याची पिसं काढली. या एकाच षटकात अर्शदीपने ४ वाईड बॉलसह तब्बल २४ धावा खर्च केल्या. अभिषेकने त्याच्याविरुद्ध दोन चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार खेचले. या खराब कामगिरीनंतर कर्णधाराने त्याला तातडीने गोलंदाजीवरून हटवले.
हेड-अभिषेकची १२० धावांची भागीदारी –
हैदराबादच्या या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी केवळ ८.३ षटकांत १२० धावांची तुफानी भागीदारी केली. ट्रॅव्हिस हेड २३ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला, तर अभिषेक शर्माने २७ चेंडूत ७४ धावांची स्फोटक खेळी केली. विशेष म्हणजे, शशांक सिंगने या दोन्ही सेट फलंदाजांना बाद करून पंजाबला काहीसा दिलासा दिला. SRH World Record





