Abhishek Sharma breaks Chris Gayle’s record : आयपीएल २०२६ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) युवा फलंदाजांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक फलंदाजी दाखवली आहे. बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माने तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर अभिषेकने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला आहे. अभिषेकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम – अभिषेकने केवळ १३ चेंडूंत ३५ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौके आणि ४ उत्तुंग षटकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २६९.२३ इतका होता. यासह अभिषेक शर्माने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा पराक्रम केला आहे. तो आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून २०० च्या वरच्या स्ट्राईक रेटने ३० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करणारा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. Combining power and elegance so effortlessly 😲 🎥 Abhishek Sharma with two 6️⃣s that make you go WOW 🤩 Updates ▶️ https://t.co/8L0gAuxW78#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvPBKS | @SunRisers pic.twitter.com/ZkNRO3r5ZI — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026 अभिषेकने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत १४ वेळा हा कारनामा केला आहे, तर ख्रिस गेलने १३ वेळा अशी कामगिरी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन (१२ वेळा) आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (११ वेळा) आणि सनरायझर्स हैदराबादमधील त्याचाच साथीदार ट्रॅव्हिस हेड (९ वेळा) यांचा क्रमांक लागतो. अभिषेक शर्मा भलेही आपल्या अर्धशतकापासून मुकला असला, तरी त्याने आपल्या या तडाखेबंद खेळीने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे. हेही वाचा – Mumbai Indians Captaincy : हार्दिक-सूर्या संघाबाहेर… रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार? नेमकं कारण काय? हैदराबादने पंजाबसमोर ठेवलं २३६ धावांच लक्ष्य – पंजाबविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने पंजाबसमोर २३५ धावांचे (२३५/४) भलेमोठे आव्हान ठेवले. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड (१९ चेंडूंत ३८ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. यानंतर यष्टीरक्षक इशान किशनने ३२ चेंडूंत ५५ धावा (२ चौके, ४ षटकार) कुटल्या. शेवटच्या टप्प्यात हेनरिक क्लासेनने ४३ चेंडूंत ६० धावांची उत्कृष्ट खेळी केली. तसेच, शेवटी नितीश कुमार रेड्डीने नाबाद २३ धावांचे योगदान दिले.