Kohli World Record : ‘किंग’ कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! कुमार संगकाराला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास
Kohli World Record : विराटने श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराचा अनेक वर्षांचा विश्वविक्रम मोडला आहे

Virat Kohli Breaks Kumar Sangakkara World Record Most Away ODI Runs IND vs ENG 2nd ODI : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने क्रिकेटच्या इतिहासात आणखी एका सुवर्ण विक्रमाची नोंद केली आहे. इंग्लंडविरुद्ध कार्डिफ येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराटने श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराचा अनेक वर्षांचा विश्वविक्रम मोडला आहे.
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी आपली धावांची भूक कायम असल्याचे विराटने या खेळीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या सामन्यात विराटने ६५ धावांची दमदार खेळी केली, ज्यात त्याने जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
विरोधी संघाच्या देशात विराटच ‘किंग’ –
विराट कोहली आता विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर जगात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी ३७ वर्षीय विराटला हा रेकॉर्ड करण्यासाठी केवळ ४६ धावांची गरज होती. भारताच्या डावातील २४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ४६ वी धाव घेताच त्याने संगकाराला मागे टाकले.
Innings Break!
Virat Kohli & Shreyas Iyer with vital fifties for #TeamIndia.
Over to the bowlers to defend this!
Scorecard ▶️ https://t.co/2Z0BQOPWjC #ENGvIND pic.twitter.com/4w8wjK1unh
— BCCI (@BCCI) July 16, 2026
श्रीलंकेच्या कुमार संगकाराने विरोधी संघाच्या देशांत १४९ सामन्यांत ५,५१८ धावा केल्या होत्या. विराटने केवळ १२६ व्या सामन्यात (संगकारापेक्षा २३ सामने कमी खेळून) ५,५४१* धावा करत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. या यादीत रिकी पाँटिंग तिसऱ्या, तर सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानावर आहे.
परदेशी भूमीवर ८ हजारी मनसबदार –
या ६५ धावांच्या खेळीदरम्यान विराटने विरोधी संघाचे मैदान आणि तटस्थ मैदाने मिळून परदेशात ८,००० एकदिवसीय धावांचा टप्पाही पार केला. भारताकडून परदेशात ८ हजारहून अधिक धावा करणारे आतापर्यंत केवळ सचिन तेंडुलकर (११,४५० धावा) आणि सौरव गांगुली (८,१११ धावा) हेच दोन फलंदाज होते. हा पराक्रम करणारा विराट तिसरा भारतीय, तर जगातील केवळ सातवा फलंदाज ठरला आहे.





