Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का! बड्या नेत्याने अनेक कार्यकर्त्यांसह सोडली साथ
Maharashtra Politics : मुंबईतील अंधेरी परिसरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेअंतर्गत उद्धव ठाकरेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा झटका दिल्याची चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)
शिवसेना शाखा क्रमांक ९२ चे शाखाप्रमुख रामशरण चांदेलिया यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आज संध्याकाळी ५०० हून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. (Maharashtra Politics)
रामशरण चांदेलिया हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या पक्षप्रवेशाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
हा भव्य पक्षप्रवेश सोहळा अंधेरीतील शेरे पंजाब ग्राउंड येथे पार पडणार असून शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेद्वारे शिंदे गटाने ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Maharashtra Politics)
हेही वाचा





