Sonu Nigam : छी! अशा कलाकारांना लाज वाटायला हवी! नेटकऱ्यांचा संताप; प्रसिद्ध गायक सोनू निगम असं काय म्हणाला?
Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगम याने या आंदोलनावर प्रतिक्रिया देणे टाळल्याने तो सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला आहे.

Sonu Nigam : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा मागणीसाठी सीजेपीचे दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. २० जुलै रोजी ‘चलो संसद’चा नारा देत हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी संसदभवनाकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेत अडवले आणि लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाईचा देशभरातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. बॅालिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, प्रसिद्ध गायक सोनू निगम याने या आंदोलनावर प्रतिक्रिया देणे टाळल्याने तो सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला आहे. ( Sonu Nigam)
“आता हे संपलं आहे, बस्स” (Sonu Nigam)
एका कार्यक्रमासाठी सोनू निगमने हजेरी लावली होती. यावेळी त्याला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच त्याने मध्येच थांबवत, “मी इथे कशाला आलो आहे? बस्स,” असे उत्तर दिले. त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न झाल्यावरही “आता हे संपलं आहे, बस्स,” असे म्हणत त्याने अधिकचे भाष्य करण्यास नकार दिला. सोनू निगमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करत “अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे,”, “त्याच्या कॉन्सर्टला जाणार नाही,”, “त्याच्यावर बहिष्कार टाका,” अशा तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तो संवेदनशील विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही केला आहे.
View this post on Instagram
कलाकारांचा आंदोलनाला पाठिंबा (Sonu Nigam)
दरम्यान, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईनंतर अनेक कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक कलाकार विद्यार्थ्यांसाठी आंदोलनातही सहभागी झाले आहेत. अभिनेता दुल्कर सलमान, दिग्दर्शक इम्तियाज अली, अभिनेत्री अदिती राव हैदरी, आयेशा खान यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत सरकारने या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.





