Rahul Gandhi : तरूणांच्या भविष्याचे सर्वांधिक नुकसान मोदींनीच केले.! राहुल गांधींची जोरदार टीका
तरूणांच्या भविष्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Rahul Gandhi – तरूणांच्या भविष्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. तरूणांच्या भविष्याचे सर्वांधिक नुकसान मोदींनीच केले, अशी टिप्पणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.
मोदींनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण कब्जा होऊ दिला आणि ती व्यवस्था उद्धवस्त होऊ दिली. त्यासाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्या अतिशय स्पष्ट आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्यात यावे.
विद्यार्थ्यांची माफी मागितली जावी. विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा त्या मागण्या आहेत, असे राहुल यांनी सोशल मीडियावरून म्हटले.
पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण निर्णय :
नीट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांचे भविष्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पेपरफुटीप्रकरणी दोषींना जलद शिक्षा देण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकरणाला पंतप्रधानांनी ‘घोर पाप’ संबोधत केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच असून, सरकारने संसदेत चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.






