Gurinderveer Singh Records : भारतीय अॅथलेटिक्समध्ये सुवर्णक्षण! एकाच दिवशी ३ मोठे राष्ट्रीय विक्रम उद्ध्वस्त
Gurinderveer Singh Records : राष्ट्रीय वरिष्ठ महासंघ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अनेक राष्ट्रीय विक्रम मोडले गेले आणि खेळाडूंनी इतिहास रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Gurinderveer Singh Records 2026 : रांची येथील बिरसा मुंडा अॅथलेटिक्स स्टेडियमवर आयोजित ‘राष्ट्रीय सीनियर फेडरेशन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’चा (Federation Cup 2026) दुसरा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. देशातील अव्वल अॅथलीट्सनी ट्रॅक आणि फील्ड दोन्ही प्रकारात अविश्वसनीय कामगिरी करत केवळ वैयक्तिक यशच मिळवले नाही, तर राष्ट्रीय रेकॉर्ड बुक देखील पूर्णपणे बदलून टाकले. एकाच दिवशी तीन मोठे राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाल्याने भारतीय क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
१०० मीटर शर्यतीत गुरिंदरवीर सिंiचा नवा राष्ट्रीय विक्रम!
स्पर्धेतील सर्वात मोठा धमाका गुरिंदरवीर सिंगने (Gurinderveer Singh) केला. पुरुषांच्या १०० मीटरच्या मुख्य शर्यतीत त्याने अवघ्या १०.०९ सेकंदाची वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम (National Record) प्रस्थापित केला. सुरुवातीपासूनच वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गुरिंदरवीरने फिनिशिंग लाईनपर्यंत आपला वेग कायम ठेवला. त्याचे हे टायमिंग सध्याच्या हंगामात संपूर्ण आशिया खंडातील सर्वात वेगवान कामगिरी पैकी एक मानले जात आहे.
📸 #GurindervirSingh clinches the gold medal in the men’s 100m event at the 2026 Athletics Federation Cup, with a new national record timing of 10.09 seconds. #IndianAthletics #AthleticsIndia #AFI @YASMinistry II @MIB_India II @PIB_India pic.twitter.com/vG9TmJx7xU
— All India Radio News (@airnewsalerts) May 24, 2026
४०० मीटरमध्ये विशाल टी.के.चा चमत्कार; ४५ सेकंदांची भिंत तोडणारा पहिला भारतीय!
४०० मीटर शर्यतीत तामिळनाडूच्या विशाल टी.के. याने असा कारनामा केला, ज्याची भारतीय अॅथलेटिक्स गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. विशालने ही रेस अवघ्या ४४.९८ सेकंदात पूर्ण केली. ४५ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ही शर्यत पार पाडणारा तो इतिहासातील पहिला भारतीय धावक ठरला आहे. यासह त्याने गेल्या वर्षीचा स्वतःचाच ४५.१२ सेकंदांचा रेकॉर्ड मोडीत काढला.विशालने २०२६ कॉमनवेल्थ गेम्सचे (Commonwealth Games 2026) तिकीट देखील पक्के केले आहे.
डेकाथलॉनमध्ये तेजस्विन शंकरने ओलांडला ८००० अंकांचा टप्पा!
ट्रॅक स्पर्धांशिवाय फील्ड इव्हेंटमध्येही भारताचा दबदबा पाहायला मिळाला. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या डेकाथलॉन (Decathlon) प्रकारात तेजस्विन शंकरने तब्बल ८,०५७ गुण मिळवून नवा राष्ट्रीय विक्रम रचला. भारताच्या अॅथलेटिक्स इतिहासात ८,००० अंकांचा टप्पा ओलांडणारा तो देशातील पहिलाच खेळाडू बनला आहे. सलग दोन दिवस विविध १० क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत तेजस्विनने आपले वर्चस्व सिद्ध केले आणि आशियाई स्तरावर भारताची मान उंचावली.





