Narapur Case : “असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करा”; नसरापूर प्रकरणातील चिमुकलीच्या वडिलांची प्रतिक्रिया
Narapur Case : "माझ्या चिमुकलीला आणि इतर अत्याचार झालेल्या पिडीतांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आरोपींना कठोर फाशीची शिक्षा करावी"

Narapur Case : पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका 65 वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर दगडाने ठेचून निर्घृणपणे तिची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली.
त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर राज्यभरातून या प्रकरणी संताप व्यक्त केला.
पुण्यात मुक मोर्चा
यानंतर काल नसरापूर प्रकरणातील पिडितेच्या न्यायासाठी पुण्यात मुक मोर्चा काढला होता. त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी सरकारला लवकरात लवकर न्याय देण्याचं आवाहन केलं. “आपण सर्व आज जो समाज म्हणून एकत्र जमलोय ते फक्त माझ्या मुली करता नाही, तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा समाज एकत्र झालेला आहे. जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथे या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची होळी व्हावी, यासाठी मूक मोर्चाची सांगता केली आहे.
असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करायला हवी, त्यामुळे असा प्रकार घडणार नाही. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नव्हता. समाज अजून जिवंत आहे. हे न्यायव्यवस्थेला दाखवून देण्यासाठी होता. आज आपण शांतता मोर्चा काढला. मात्र अशा मोर्चांनी हिंसेत वळन होऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी,” असे पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांनी भाष्य केलं.
“अशा घटना होऊ नये म्हणून कठोरात कठोर कायदा करावा”
“माझ्या चिमुकलीला आणि इतर अत्याचार झालेल्या पिडीतांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आरोपींना कठोर फाशीची शिक्षा करावी. असं मी निवेदन करतो. पुढे अशा घटना होऊ नये म्हणून कठोरात कठोर कायदा करावा, यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस प्रशासन, सरकार खूप चांगलं सहकार्य करत आहे. सरकार आणि प्रशासन माझी जी अपेक्षा होती त्यापेक्षा उत्तम काम करतायत. 11 तारखेला चार्जशिट दाखल होईल, असं पोलिसांनी मला निवेदन दिलं आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, या नराधमाला इतकं गंभीर कृत्य करूनही त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरीही आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावा या नराधमाने कोर्टात केला. या नराधमाने याआधी दोन वेळा असे कृत्य केले आहे, मात्र पुरावे नसल्यानं तो निर्दोष सुटला. त्यामुळे आता या आरोपीला फाशीचच शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा:






