Vijay Thalapathy : थलपती विजय नव्हे, तर भाजप करणार सरकार स्थापन; ‘या’ खासदाराच्या दाव्याने खळबळ
Vijay Thalapathy : तमिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाला १०८ जागा मिळाल्या आहेत. यावर भाष्य करताना पप्पू यादव यांनी भाजपवर निशाणा साधला

Vijay Thalapathy : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी आवश्यक ११८ जागांचा आकडा गाठण्यासाठी पक्षाला अजून १० आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. (Vijay Thalapathy)
या पार्श्वभूमीवर बिहारचे खासदार पप्पू यादव यांनी भाजप आणि राज्यपालांवर उपरोधिक टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी म्हटले की, तमिळनाडूच्या राज्यपालांनी भाजपच्या एकमेव आमदारालाच सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावे. कारण त्यांना बहुमत सिद्ध करणे सर्वात सोपे जाईल, असं खासदार पप्पू यादव यांनी म्हटले आहे. (Vijay Thalapathy)
तमिलनाडु में राज्यपाल को BJP के
एकमात्र विधायक को सरकार बनाने का
आमंत्रण देना चाहिए!उन्हें बहुमत साबित करना सबसे आसान है
गवर्नर, ED, CBI, IT विभाग और चुनाव आयोग
जी तोड़ परिश्रम कर उनके लिए बहुमत सहजता से
जुटा देंगे!— Pappu Yadav (@pappuyadavjapl) May 8, 2026
तसेच त्यांनी ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. (Vijay Thalapathy)
दरम्यान, आता TVK च्या सत्तेचे भवितव्य CPI, CPM आणि VCK या पक्षांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. हे तिन्ही पक्ष सध्या DMK आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे विजय यांना पाठिंबा द्यायचा की जुनी आघाडी कायम ठेवायची, याबाबत मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. (Vijay Thalapathy)





