2029 सुनेत्रा पवार मुख्यमंत्री – जय पवार Top 10 News : बारामतीत 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभ राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केलंय. दरम्यान , त्यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडालीय. खासदार निलेश लंके यांची अचानक प्रकृती खालावली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून लंके यांच्यावर अहिल्यानगरमध्येच उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यात नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, खासदार लंके यांच्या प्रकृतीबाबत वृत्त समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अहिल्यानगरवरून पुण्याकडे प्रवासादरम्यान डॉक्टरांची एक टीम त्यांच्यासोबत आहे. TCS धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला अखेर अटक राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्यसूत्रधार असलेली संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदा खान अखेर अटक करण्यात आली आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांकडून अनेक पथकं तैनात करत तिचा राज्यभर शोध घेतला जात होता. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून मोबाईलसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे देखील जप्त केले आहे. यात दोन स्मार्टफोन नाशिक पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद राज्यातील सर्व नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. २० मे रोजी पुण्यासह राज्यातील सर्व मेडिकल बंद राहणार आहेत. २० मे ला देशभरातील औषध विक्रेते बंद पाळणार असून औषध दुकानदारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अव्यवसायिक स्पर्धेविरोधात हा बंद पुकारलाय. या ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं म्हटलंय. मात्र बंददरम्यान सर्व औषध दुकाने बंद ठेवली जाणार असली तरी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलंय. पोटच्या गोळ्यासाठी बिबट्याशी लढला एक बाप Top 10 News : जुन्नरमध्ये बिबट्याचं थैमान सुरू असतानाच, शिरोली बुद्रुकमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. पाचवीत शिकणारा मुलगा आपल्या वडीलांसोबत दुचाकीवरून जात असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही, मुलाच्या रक्षणासाठी हा बाप ढाल बनून रिकाम्या हातानेच बिबट्याशी लढला.बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने जुन्नरमध्ये संतापाचा स्फोट झालाय. प्रशासनाकडून योग्य कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ममता बॅनर्जी सरकार बरखास्त पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाला बरखास्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी संवैधानिक अधिकारांचा वापर करत हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पहिल्या सरकारच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. 9 मे रोजी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंड येथे शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. …तर टीव्हीकेचे सर्व १०८ आमदार सामूहिक राजीनामा देतील तामिळनाडूच्या निवडणुकीत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. मात्र, टीव्हीके पक्ष बहुमतापासून दूर असल्याने सरकार स्थापन करण्यासाठी विजय जोसेफ यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं दिसून येत आहे. विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची दोनदा भेटही घेतली आणि ११३ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. मात्र, राज्यपालांनी ‘११८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन या’ असं सांगत नियमांवर बोट ठेवलं.दुसरीकडे ‘डीएमके’ आणि ‘एआयएडीएमके’ हे पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चेवर टीव्हीके पक्षाच्या आमदारांनी.‘जर डीएमके आणि एआयएडीएमकेने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तर टीव्हीकेचे सर्व १०८ आमदार सामूहिक राजीनामा देतील’,असा इशारा दिलाय. युद्धविरामादरम्यान युद्ध पुन्हा भडकणार जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापारी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराणच्या नौदलामध्ये भीषण संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केल्याचा दावा केला असून, यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा भडकलीय. याविषयी अमेरिकीएचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेचे तीन ‘डिस्ट्रॉयर’ होर्मुजमधून जात असताना इराणने त्यांच्यावर गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. मात्र या हल्ल्याने अमेरिकन नौदलाच्या तिन्ही युद्धनौका सुरक्षितपणे बाहेर पडल्या असून त्यांना कोणतेही नुकसान झाले नसून उलट इराणच्या अनेक लहान नौकाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केलाय. तर अमेरिकेच्या या दाव्याला इराणने फेटाळून लावलंय. तब्बल एका महिन्यानंतर लखनऊचा विजय लखनऊचं अखेर नशीब फळफळलं आणि संघाने आरसीबीचा पराभव करत एका महिन्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये सामना जिंकला आहे. ऋषभ पंतने गेल्या सामन्यातील पराभवानंतर सामना जिंकण्यासाठी नशीबाची गरज असते, असं म्हटलं होतं. त्यानुसार लखनौच्या बाजूने आज नशीब असल्याने संघाने कमालीच्या सांघिक कामगिरीसह सामना जिंकला. आरसीबीचा अखेरच्या षटकात लखनौने ९ धावांनी पराभव केला, या पराभवासह आरसीबीची प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्याची संधी हुकलीय. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, पावसामुळे दोन-तीन वेळा खेळात व्यत्यय आला, ज्यामुळे सामना थांबवावा लागला. त्यामुळं संपूर्ण सामन्यातून केवळ 2 षटके कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना, मिचेल मार्शच्या अविस्मरणीय शतकाच्या जोरावर लखनऊने 209 धावा केल्या. यानंतर, डकवर्थ-लुईस प्रणालीनुसार आरसीबीला 213 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात, प्रिन्स यादवच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनऊने बंगळूरूला 203 धावांवर रोखलं. शिवरायांचे विचार आम्हाला प्रेरणा देतात – अरबाज शेख Top 10 News : सैराट फेर अरबाज शेख याने गर्लफ्रेंड सिमरनशी निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. खर तर अरबाजने ३ वर्षांपूर्वीच सिमरनशी निकाह केला होता पण त्याने आता सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. या फोटोवर काही चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पण काहींनी त्याला ट्रोल केलं. दरम्यान, आता अरबाजने अशा ट्रोलर्सला उत्तर दिलंय. मी माझ्या पत्नीसोबत फोटो टाकल्यानंतर अनेकांनी कमेंट्स केल्या कि, याने मुस्लिम असूनही हिंदू मुलीशी लग्न केलं, पण लोकांना हे माहिती नाही कि ती सुद्धा मुस्लिमच आहे. पण आम्हाला या सगळ्यात अडकायचं नाही.आम्ही जन्माने मुस्लिम असलो तरी मनाने मराठी आहोत. माझ्या घरात आणि गळ्यात शिवरायांचा फोटो आहे कारण त्यांचे विचार आम्हाला प्रेरणा देतात. पण फक्त आमचा धर्म वेगळा असल्याने आमहाला विरोधाचा सामना करावा लागतोय.असं त्यानं म्हटलंय.