Top 10 News: 1. सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच विमान अपघाताबाबत व्यक्त केली शंका अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण झाले आहे. यानंतर काल बारामतीत झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेमध्ये सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली. “अजितदादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विनंती केली आहे. काही चुकीचं आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी. अजितदादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचं निरसन व्हायला हवं, अशी मागणी सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही मंचावर उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी केलेल्या मागणीवर फडणवीसांनीही, अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. Sunetra Pawar 2. सावधान ! लोणावळा फिरायला जाताय? महाराष्ट्रासह देशभरातून लोणावळामध्ये पर्यटक आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांत लोणावळ्याच्या नावाने पर्यटकांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका पर्यटकाने ऑनलाईन व्हिला बुकींग गेला, मात्र त्या जागेवर कुठलाही बंगला नसल्याचे प्रत्यक्ष तिथं पोहोचवल्यावर उघडकीस आल्याने आपली फसवणूक झाल्याचे पर्यटकाच्या लक्षात आले. बुकिंगच्या नावाखाली 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते, इतकंच नाही तर संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र, प्रत्यक्षात तेथे काहीच नसते. या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या फसवणुकीपासून वाचण्यासाठी पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करावा आणि सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. Tushar Doshi : तुषार दोशी पुन्हा अडचणीत? नव्या कारनाम्याने पोलीस दलात खळबळ 3. ‘भाजपा भगाओ, देश बचाओ!’ सपकाळांचा हल्लाबोल भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चामध्ये वाहतुक कोंडी झाल्यानं एका चिडलेल्या महिलेनं थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला, त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे. आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ!’ असं ट्विट सपकाळ यांनी केलं आहे. Ashok Kharat 4. अशोक खरातची चौकशी सुरु असतानाच प्रकृती बिघडली भोंदूबाबा अशोक खरात याची मंगळवारी एसआयटीकडून चौकशी सुरु असताना प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात याला चौकशी सुरु असताना अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. यानंतर त्याच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आला. अशोक खरात याच्यासाठी तात्काळ कार्डियाक अॅम्ब्युलन्स बोलावून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अलीकडेच अशोक खरात याच्या वकिलांनी न्यायालयात एक महत्त्वाची मागणी केली होती. आरोपीच्या खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्याचे डोकेही दुखत आहे. पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नसल्याने अशोक खरात याला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे, अशी मागणी खरातच्या वकिलांनी केली होती. यानंतर तीन दिवसांतच अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याने शंकाही उपस्थित झाली आहे. 5. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण जम्मू आणि काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्यावर्षी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले होते. या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे. सध्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घनदाट जंगले आणि डोंगराळ भागात अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला जात आहे. Top 10 News राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षा दलांची गस्त वाढवण्यात आली असून, प्रत्येक संशयास्पद वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. या निमित्ताने संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच सीमावर्ती भागापासून ते पर्यटन स्थळांपर्यंत सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 6. ‘एकतर्फी निर्णय’, इराणने ट्रम्प यांचा आदेश फेटाळला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा केली असली तरी, इराणने ती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. इराणचे म्हणणे आहे की, हा ‘एकतर्फी निर्णय’ असून आम्हाला हा निर्णय मान्य नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय हितानुसारच पुढील रणनिती आखू. इराणच्या संसदेच्या अध्यक्षांचे सल्लागार महदी मोहम्मदी यांनीही ट्रम्प यांच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ट्रम्प यांनी केलेली शस्त्रसंधीची मुदतवाढ अप्रासंगिक आहे. पराभूत मानसिकता असलेले दुसऱ्यांवर अटी लादू शकत नाहीत.” इराणच्या या विधानावरून हे स्पष्ट होते की, इराण या संपूर्ण प्रकरणात माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाही. 7. केरळ स्फोट: मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केरळमधील त्रिशूर येथे मंगळवारी दुपारी एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाले. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुण्डाथिकोड परिसरातील एका शेडमध्ये आगामी ‘त्रिशूर पूरम’ उत्सवासाठी फटाके तयार करण्याचे काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी साधारणपणे ४० कामगार उपस्थित असल्याचा अंदाज आहे. यांपैकी अनेक जण गंभीररीत्या भाजले आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या घटनेसंदर्भात तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, जखमींना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत, “ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो,” असे म्हटले आहे. लक्षवेधी : अर्थव्यवस्थेतील आशा-निराशा 8. “९० टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत” पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी राजकारणात काम करणाऱ्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ९० टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत, असे विधान पप्पू यादव यांनी केले. आता या वक्तव्यावरून बिहार राज्य महिला आयोगानेपप्पू यादव यांना नोटीस बजावली असून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांच्याकडून ही नोटीस जारी करत पप्पू यादव यांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नोटिसमध्ये म्हंटले आहे की, ‘एका व्हिडीओमध्ये आपण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य केलं आहे. राजकारणात काम करणाऱ्या महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्यासोबत ‘बेड शेअर’ करूनच पुढे येतात. ९० टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत. दररोज सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत असतात. शाळा असो किंवा कार्यालय, प्रत्येक ठिकाणी महिलांचे शोषण होते, असे तुम्ही म्हटलं आहे. तुमचे हे विधान महिलांचा आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणारे आहे.’ Abhishek Sharma Record 9. अभिषेक शर्माचे तुफानी शतक इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आली असताना सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याला अप्रतिम सूर गवसला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि या निर्णयाचा पुरेपूर फायदा अभिषेक शर्माने उपभोगला. अभिषेक शर्माने केवळ २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आणखी २२ चेंडूत ५० धावा जोडल्या आणि एकूण ४७ चेंडूत शतक झळकावले. Top 10 News: हे या हंगामातील त्याचे पहिले शतक आहे. या खेळीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अभिषेक शर्माचे टी२० क्रिकेटमधील हे नववे शतक ठरले. यासह तो क्विंटन डीकॉक, विराट कोहली, रिली रोसो आणि साहिबजादा फरहान यांच्यासोबत संयुक्तपणे नऊ शतकांच्या यादीत सामील झाला आहे. 10. ‘आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा!’ महाराष्ट्र सरकारने १ मेपासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक केलं आहे. ५९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये याची पडताळणी केली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय की, ज्या चालकांना मराठी येणार नाही, त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात. या नियमाच्या विरोधात रिक्षा युनियनने ४ मे पासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. युनियनच्या मते, जवळपास १५ लाख रिक्षाचालकांना हा नियम मान्य नाही. Top 10 News यावरून हेमंतने ट्विटरवर पोस्ट लिहित म्हटलं की, “१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या 15 लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा! महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!” हेमंतच्या पोस्टला मराठी समर्थकांकडून पाठिंबा मिळत आहे. हेही वाचा : Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज! ‘हा’ मॅचविनर खेळाडू संघात परतला