Tollywood Actress Aamani : तेलुगू अभिनेत्री आमनी यांचा भाजपमध्ये प्रवेश !
Updated On:

Tollywood Actress Aamani – तेलुगू अभिनेत्री आमनी यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या तेलंगणातील महत्वाची राजकीय घडामोड म्हणून त्या प्रवेशाकडे पाहिले जात आहे. आमनी यांच्याकडे नव्वदच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून पाहिले जात होते.
त्यांनी कमल हासन, नागार्जुन यांसारख्या प्रमुख अभिनेत्यांसमवेत काही सुपरहिट चित्रपटांत भूमिका केल्या. त्यांनी केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी आणि प्रदेशाध्यक्ष एन.रामचंदर राव यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
तेलंगणात कॉंग्रेस आणि भारत राष्ट्र समिती हे पक्ष एकमेकांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. त्या राज्यात अद्याप भाजप फारसा राजकीय प्रभाव पाडू शकलेला नाही. पुढील काळात तेलंगणात पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.





