इडलीची भुरळ आता गुगललाही; आजच्या गुगल डुडलमुळे इडलीचा खास इतिहास चर्चेत, वाचा…

मुंबई : दक्षिण भारताची ओळख असलेली इडली ही नाश्त्याची आवडती पदार्थ आता जगभरात प्रसिद्ध आहे. सकाळी चटणीसोबत किंवा रात्री सांबारसोबत इडलीला ‘नाही’ म्हणणारे खूपच कमी असतील. पारंपरिक इडली-सांबार-चटणीसोबतच आता मसाला इडली, शेजवान इडली, गार्लिक इडली किंवा चायनिज इडलीसारखे नवीन व्हेरिएशन्सही लोकप्रिय झाले आहेत.
या इडलीची भुरळ आता गुगललाही पडली असून, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी गुगलने तिच्यासाठी एक खास अॅनिमेटेड डुडल तयार केले आहे. हे डुडल ‘फूड अँड ड्रिंक’ थीम अंतर्गत आहे.
गुगल डुडलमध्ये ‘गुगल’ हा शब्द इडली, सांबार आणि चटणीसारख्या दक्षिण भारतीय पदार्थांच्या घटकांद्वारे तयार केला आहे. ते केळीच्या पानावर ठेवलेले दाखवले आहे. डुडल क्लिक केल्यावर गुगल सांगते, आजचे डुडल इडलीला समर्पित आहे. ही दक्षिण भारतीय खासगीत, भात आणि उडद दाळीच्या फर्मेंटेड बॅटरपासून बनवलेली स्टीम्ड केक आहे.
हे डुडल इडली बनवण्याच्या स्टेप्सप्रमाणे रंजक आहे. तांदूळ भिजवणे, पीठ करणे, फर्मेंटेशन आणि स्टीमिंग जणू काही एका केळीच्या पानावर रेसिपी शेअर केली आहे. ३० मार्च हा वर्ल्ड इडली डे म्हणून साजरा केला जातो, पण हे डुडल इडलीच्या सांस्कृतिक आणि पौष्टिक महत्त्वाला समर्पित आहे.
इडलीचा मूळ इतिहास काय?
इडली दक्षिण भारतीय असली तरी तिचे मूळ कुठले याबाबत वाद आहेत. काहींच्या मते, ती इंडोनेशियातील ‘केरपुक’ सारख्या पदार्थाची विकसित रूप असून, व्यापाऱ्यांमार्फत भारतात आली. पण बहुसंख्य इतिहासकार आणि भारतीयांचे मत आहे की इडली ही पूर्णपणे भारतीय आहे. १०व्या शतकातील कन्नड ग्रंथ ‘वद्दरंगमूळ’ मध्ये तिचा उल्लेख आहे. तमिळनाडूतील प्राचीन साहित्यातही ‘इडली’ सारखे वर्णन आढळते. ही फर्मेंटेड डिश प्रोटीन, फायबर आणि प्रोबायोटिक्सने भरपूर असल्याने आरोग्यदायी आहे. ज्यामुळे ती जगभरात हिट झाली आहे.





