Healthy Breakfast: दररोज उपमा-पोहे-इडली खाताय? फायदे की तोटे…एक्सपर्टने दिला महत्त्वाचा सल्ला
Healthy Breakfast डायटिशियन यांच्या मते, उपमा, पोहे आणि इडली हे पदार्थ मुख्यतः कार्बोहायड्रेट्सने भरलेले असतात. त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण तुलनेने कमी असते.

Healthy Breakfast: आजकाल हेल्दी लाइफस्टाइलकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे अनेकजण नाश्त्यामध्ये उपमा, पोहे आणि इडली यांसारख्या पारंपरिक पदार्थांना प्राधान्य देत आहेत. हे पदार्थ हलके, पचायला सोपे आणि आरोग्यासाठी चांगले मानले जातात. पण हेच पदार्थ रोज खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. Healthy Breakfast
डायटिशियन यांच्या मते, उपमा, पोहे आणि इडली हे पदार्थ मुख्यतः कार्बोहायड्रेट्सने भरलेले असतात. त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे जर हे पदार्थ रोज नाश्त्यात खाल्ले आणि त्यात संतुलन नसेल, तर शरीरातील ब्लड शुगर अचानक वाढते आणि नंतर लगेच कमी होते. यामुळे थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते, पण ती पटकन कमीही होते. Healthy Breakfast

Upma
यामुळे सकाळी खाल्ल्यानंतर काही वेळातच पुन्हा भूक लागते, क्रेविंग्स वाढतात आणि जास्त खाण्याची सवय लागू शकते. अशा पद्धतीने जर दीर्घकाळ हा आहार चालू राहिला, तर वजन वाढणे, पोटावर चरबी साचणे आणि इन्सुलिन रेजिस्टन्ससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. Healthy Breakfast
विशेषतः ज्या लोकांची जीवनशैली बसून काम करण्याची आहे, त्यांना याचा जास्त परिणाम होऊ शकतो. अनेकांना वाटतं की आपण हलका नाश्ता करतो, पण जर त्या नाश्त्यात प्रोटीन आणि फायबर नसतील, तर शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो. त्यामुळे अपेक्षित फायदे मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं.

Poha
तज्ज्ञ सांगतात की, याचा अर्थ असा नाही की उपमा, पोहे किंवा इडली हे पदार्थ वाईट आहेत. समस्या पदार्थांमध्ये नसून, ते कसे खाल्ले जातात यात आहे. जर योग्य पद्धतीने आणि संतुलन राखून हे पदार्थ खाल्ले, तर ते खूपच आरोग्यदायी ठरू शकतात.
उदाहरणार्थ, पोहे बनवताना त्यात शेंगदाणे, अंकुरित कडधान्ये आणि भाज्या घालाव्यात. त्यामुळे प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढते. उपमामध्ये डाळी, पनीर किंवा बिया मिसळल्यास तो अधिक पौष्टिक होतो. इडली खाताना सांबारसोबत खाणे महत्त्वाचे आहे, कारण सांबारमध्ये डाळी आणि भाज्या असतात, ज्यामुळे पोषणमूल्य वाढते. Healthy Breakfast

idli
तसेच, नाश्त्यामध्ये प्रोटीनचा स्रोत असणे आवश्यक आहे. मांसाहारी लोक अंडी खाऊ शकतात, तर शाकाहारी लोक पनीर किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकतात. यामुळे अन्न हळूहळू पचते आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते. Healthy Breakfast
एकूणच, कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कधीही एकटे खाऊ नयेत. त्यांना प्रोटीन आणि फायबरसोबत संतुलित केल्यासच ते खऱ्या अर्थाने हेल्दी ठरतात. योग्य पद्धतीने आहार घेतल्यास उपमा, पोहे आणि इडली हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.





