धनुषच्या ‘इडली कढाई’ सिनेमाच्या सेटला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Fire On Idli Kadai Set | लोकप्रिय दिग्दर्शक-अभिनेता धनुषच्या ‘इडली कढाई’ सिनेमाच्या सेटला आग लागली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे ही आग लागली. खूप प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले.
इडली कढाई’मध्ये धनुष दुहेरी भूमिकेत आहे. त्याने अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. चित्रपटाचे शूटिंग थेनी जिल्ह्यातील अंदीपट्टी येथे झाले होते. यासाठी चित्रपटाच्या क्रूने नवीन सेट उभारला होता. या सेटवर 20 दिवसांहून अधिक काळ शूटिंग चालले होते. मात्र या सिनेमाच्या सेटला अचानक आग लागली. Fire On Idli Kadai Set |
View this post on Instagram
दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही आग विद्युत उपकरणांमधील बिघाडामुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनुषने दिग्दर्शित केलेला हा चौथा चित्रपट आहे. धनुष आणि आकाश भास्करन डॉन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यात तो अभिनेत्री नित्या मेनन सोबत दिसणार आहे.
याशिवाय अरुण विजय, सत्यराज, पार्थिवन, शालिनी पांडे, प्रकाश राज, समुथिराकणी आणि राजकिरण हे कलाकार देखील या चित्रपटात आहेत. तर अरुण विजय खलनायकाची भूमिका साकारणार आहे. Fire On Idli Kadai Set |
चित्रपट १ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार
‘इडली कढाई’च्या निर्मात्यांनी यापूर्वी जाहीर केले होते की हा चित्रपट यावर्षी १० एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होईल. मात्र, नंतर ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा चित्रपट यावर्षी येत्या १ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘एक्स’ या हँडलवर वंडरबार फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसने ‘प्रतीक्षा संपली! ‘इडली कढाई’ १ ऑक्टोबरपासून जगभरात मोठ्या पडद्यावर येत आहे,’ असे लिहिले. Fire On Idli Kadai Set |
हेही वाचा:





