आजचे भविष्य (रविवार, 4 जुलै 2021)

मेष : तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा फलद्रूप झाल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल.
वृषभ : व्यवसायात यशाची कमान उंचावत जाईल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.
मिथुन : व्यक्तींना वेगळ्या कामाच्या निमित्ताने जादा भत्ते व सवलती मिळतील. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.
कर्क : महत्त्वाचे करारमदार होतील. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.
सिंह : कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना मानसन्मान मिळतील. नवीन जागा, वाहन, वास्तू खरेदी कराल.
कन्या : व्यवसायात कल्पकता व व्यवहार चातुर्य यामुळे उलाढाल चांगली राहील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.
तूळ : नवीन पद्धतीची कामे तुम्हाला विशेष आकर्षित करतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. खर्च वाढेल.
वृश्चिक : नोकरदार व्यक्तींना कामात उत्तम कामगिरी बजावल्याचा आनंद मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना गती येईल.
धनू : महिलांचा वेळ घरात नवीन खरेदी व गृहसजावट यात जाईल. पाहुणे येतील. प्रकृतिमानही उत्तम राहील.
मकर : विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी ताण घेऊ नये. व्यवसायात नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल.
कुंभ : ग्रहमानाची साथ असल्याने कामाचा झपाटा राहील. तरुणांचे साहस बळावेल तरी धीर धरा.
मीन : अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन कामाची जबाबदारी पार पाडाल.





