Syed Modi International 2024 : पी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक…

Syed Modi International 2024 : – भारतीय शटलर पीव्ही सिंधूने शनिवारी महिला एकेरीच्या लढतीमध्ये दमदार कामगिरी करताना सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीच्या ध्रुव कपिला व तनिषा क्रास्टो यांच्या जोडीने देखील अंतिम फेरीत धडक मारली.
पी.व्ही. सिंधूने उपांत्य फेरीत 17 वर्षीय उन्नती हुडाला 21-12,21-13 असे सरळ सेटमध्ये सेटमध्ये पराभूत केले. 28 वर्षीय सिंधूने केवळ 35 मिनिटांच्या लढतीमध्ये उन्नतीला नामविताना अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. दुसऱ्या बाजूने चीनच्या लुओ यू वूशीने देखील अंतिम लढतीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत गतविजेत्या सिंधूसमोर लुओ यू वूशीचे आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी मध्यरात्री 12.00 वाजता सुरू होईल.
लढतीनंतर बोलताना सिंधू म्हणाली, मला वाटते की उन्नतीने तिची सर्वोत्तम खेळी केली, मात्र मी तिला मला मागे टाकण्याची संधी दिली नाही. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडीवर होतो. ती एक चांगली खेळाडू आहे असल्याचे सिंधूने सांगितले.
मिश्र दुहेरीत ध्रुव-तनिषा अंतिम फेरीत…
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीने चीनच्या झोउ झी हाँग आणि यांग जिया यी यांचा 21-16, 21-15 असा पराभव करताना अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय मिश्र दुहेरी जोडीने 42 मिनिटांत सामना जिंकला. आता ध्रुव आणि तनिषा यांच्यासमोर थायलंडच्या देचापोल पुवारनुक्रोह आणि सुपिसारा पेसामप्रानचे आव्हान असणार आहे.





