Syed Modi International 2024 : जेतेपदाचा दुष्काळ संपला! पी.व्ही. सिंधूनं पटकावले महिला एकेरीचे विजेतेपद…

Syed Modi International 2024 : सय्यद मोदी इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अव्वल मानांकित पी.व्ही. सिंधू (#PVSindhu) हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वू लुओ यूचा सलग गेममध्ये 21-14, 21-16 असा पराभव केला.
PV Sindhu has done it again!! Current World no 2 is the champion of Syed Modi India International 🏸
She claims Victory, She claims Glory 🥇 pic.twitter.com/0adkBmawJF
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 1, 2024
भारताची स्टार महिला खेळाडू पी.व्ही. सिंधूची या स्पर्धेत एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली. सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनची खेळाडू लुओ यू वू हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. सिंधूने आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
पीव्ही सिंधूने अंतिम सामन्याच्या पहिल्या सेटपासूनच लुओ यू वू हिच्यावर आपला दबाव कायम ठेवला ज्यात तिने 21-14 असा विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत 21-16 असा विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात सिंधूने पूर्णपणे वर्चस्व गाजवले ज्यामध्ये तिने एकदाही चीनच्या खेळाडूला पुनरागमनाची संधी दिली नाही.
Syed Modi International 2024 : ट्रीसा-गायत्री जोडीनं पटकावले महिला दुहेरीचे विजेतेपद…
सिंधूचे 2024 मधील हे पहिलेच विजेतेपद आहे, तर 2022 मध्ये जुलैमध्ये झालेल्या सिंगापूर ओपनमध्ये तिने शेवटचे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर तिने आता (2 वर्षे, 4 महिने आणि 18 दिवस) सुरू असलेला जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश मिळवले आहे.





