Syed Modi International 2024 : लक्ष्यचा विजयी धडाका कायम, स्पर्धेच्या Semifinal मध्ये मारली धडक…

Syed Modi International 2024 (Men’s Singles) : – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि पॅरिस 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील स्पर्धक लक्ष्य सेन यांनी लखनौ येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दमदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत धडक मारली.
शुक्रवारी झालेल्या लढतीमध्ये बॅडमिंटन क्रमवारीत 18 व्या स्थानी असलेल्या पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत 118 व्या स्थानी असलेल्या चीनच्या दाई वांगचा 21-15, 21-17 असा पराभव केला. केवळ 48 मिनिटांच्या या लढतीमध्ये सिंधूने संथ सुरुवात केली होती. पहिल्या सेटमध्ये सिंधूने 9-8 वरून 16-10 अशी आघाडी घेतली आणि नंतर 21-15 असा विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने 6-5 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिने 15-8 अशी आपली आघाडी वाढविली. दाई वांगने दमदार पुनरागमन करताना 16-15 सिंधूची बढत असा कमी केली, मात्र, सिंधूने शानदार पुनरागमन करत दुसरा सेट देखील 21-17 असा जिंकला.
Lakshya Sen is currently competing at the Syed Modi India International 2024 in Lucknow, where he has advanced to the semi-finals after securing straight-game victories in his earlier matches.
“My match experience has been fantastic so far, and I’m grateful for the incredible… pic.twitter.com/4OKd8mPzHt
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 29, 2024
या मोसमातील सिंधूची ही दुसरी उपांत्य फेरी असेल. आता अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सिंधूला उन्नती हुड्डाचे आव्हान असणार आहे. उन्नतीने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या इशिका जैस्वालचा 21-16, 21-9 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उन्नतीने 2022 मध्ये ओडिशा ओपन जिंकून सर्वात तरुण बीडब्ल्यूएफ सुपर 100चे विजेतेपद मिळवणारी 17 वर्षीय उन्नती हुड्डा प्रथमच सिंधूशी सामना करेल. अन्य उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत भारताच्याच तसनीम मीर आणि श्रीयांशी वलीशेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
लक्ष्यचा धडका…
पुरुष एकेरीत, 14 व्या मानांकित लक्ष्य सेनने त्याचाच देशबांधव सहकारी माराबा लुवांग मसनामचा 21-8, 21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जुलै 2023 मध्ये कॅनडा ओपन जिंकल्यानंतर आपल्या पहिल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपदाच्या शोधात असलेला अव्वल मानांकित लक्ष्य सेन आता उपांत्य फेरीत जपानच्या शोगो ओगावाचा सामना करेल.
Syed Modi International 2024 : पी.व्ही. सिंधू आणि उन्नती हुड्डा उपांत्य फेरीत आमने-सामने….
मिश्र आणि महिला दुहेरीची जोडीही उपांत्य फेरीत….
मिश्र दुहेरीमध्ये तनिषा क्रास्टो व ध्रुव कपिला यांनी लू बिंग कुन व हो लो ई या मलेशियाच्या जोडीचा 21-16, 21-13 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तनिषा क्रास्टो ही महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पासोबत खेळणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनी महिला दुहेरीत मलेशियाच्या गो पेई की आणि टिओ मेई जिंग यांचा 21-8, 21-15 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.





