आजचा दिवस महत्वाचा! निवडणूक आयोगासोबत आघाडीतील नेत्यांची पुन्हा बैठक ; पण शरद पवार नसणार, पुण्याच्या दिशेने रवाना होणार कारण…

Sharad Pawar : राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती ठरवली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असेच चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे राहणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका अशाच सर्वच ठिकाणी निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मतदार यादीतील घोळ या मुद्यावर एकत्र आली आहे.
कालच महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी यांच्यासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत मतदार याद्यांमधील घोळ याबाबत प्रश्न विचारण्यात आले. पण समाधानकारण उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा महाविकास आघाडातील नेते आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. पण या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जाणार नाहीत.
कारण काय?
आज शरद पवार यांचा पुण्याचा नियोजित दौरा आहे. त्यामुळे ते पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आजच्या शिष्टमंडळात ते नसतील. मात्र, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे नेते आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
काय भूमिका घेणार?
मंगळवारी महाविकास आघाडीतील शिष्ठमंडळातील शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख, प्रकाश रेड्डी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती. मंगळवारी चर्चा अपुरी राहिल्यामुळे आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. यामुळे या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच आयोगातील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आघाडीतील नेते काय भूमिका घेणार हे देखील पाहाणे महत्वाचे असणार आहेत.
हेही वाचा : चीनसाठी हेरगिरी करत होते ट्रम्पचे सल्लागार? ; कोण आहेत अॅशले टेलिस ? ज्यांना अटक करण्यात आली





