धनखड यांच्यानंतर माजी मुख्य निवडणूक आयुक्तही बेपत्ता? ठाकरेंच्या खासदाराचा दावा

CEC Rajiv Kumar | माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी प्रकृतीच्या कारणामुळे अचानक राजीनामा दिला होता. मात्र राजीनाम्या दिल्यानंतर धनखड बेपत्ता असल्याचे म्हंटले जाऊ लागले होते. संजय राऊत यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे बेपत्ता असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती.
यानंतर आता आणखी एक जण बेपत्ता असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ता माजी मुख्य निवडणूक आयुक्तही बेपत्ता झाले असल्याचे शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी ट्विट करत लिहिले की, ‘२०२४ च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या गृहस्थाच्या महत्त्वपूर्ण मदतीने जिंकल्या. शिवसेना पक्ष आणि चिन्ह गद्दार गटाला देऊन त्यांनी पक्षांतराला प्रोत्साहन दिले आहे. राहुल गांधींनी आता निवडणूक आयोगाचा पक्षपात उघड केला आहे. पण ही व्यक्ती आता कुठं आहे? कोणी सांगू शकेल का? माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आधीच बेपत्ता आहेत, मग हे गृहस्थ आता नेमके कुठं आहेत?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. CEC Rajiv Kumar |
कंहा गायब हो गये ये लोग?
The 2024 Lok Sabha and Maharashtra Assembly elections were won by BJP and their allies with significant help from this gentleman! By giving the Shiv Sena party and symbol to the traitor faction, he encouraged defections! Rahul Gandhi has now exposed the… pic.twitter.com/C6yK6IgATw— Sanjay Raut (@rautsanjay61) August 17, 2025
राजीव कुमार कुठे आहेत?
“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त होते. ज्यांच्या मदतीने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक जिंकली, ते राजीव कुमार कुठे आहेत? माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे,” असे माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले. CEC Rajiv Kumar |
“राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केल्यानंतर त्याचे उत्तर राजीव कुमार यांनी द्यायला हवे होते. कारण त्यांच्याकडेच आयोगाची जबाबदारी होती. ज्यांनी शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह घटनेविरोधाच जाऊन शिंदे गटाला दिले. त्यात किती कोटींचा व्यवहार झाला, हे सुद्धा मी सांगितले होते. ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत? सोशल मीडियावर हा प्रश्न मी उपस्थित केला असून त्यावर दिल्लीच्या वर्तुळातही चर्चा सुरू आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
राजीव कुमार दिल्लीच्या बाहेर?
“ज्याप्रमाणे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड दिसत नाहीत, तसेच मत चोरी प्रकरणात राहुल गांधी आणि विरोधकांनी हल्ला सुरू केल्यानंतर तत्कालीन आयुक्तांना लोकांशी बोलण्यापासून किंवा त्यांचे मत व्यक्त करण्यापासून थांबविण्यात आले आहे. कदाचित आता त्यांना दिल्लीमध्येही ठेवलेले नाही”, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अद्याप उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानीच आहेत. परंतु, धनखड यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नाही आणि ते माध्यमांसमोरही आले नाही. CEC Rajiv Kumar |
हेही वाचा :





