Dhanajay Munde : जे कोणी दोषी असतील त्यांना…; मंत्री धनंजय मुंडे बीड प्रकरणावर स्पष्टचं बोलले

पुणेः राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण चांगलेच तापलेले आहे. या प्रकरणाचा आरोप असलेले वाल्मीक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात १४ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावले आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकिटवर्तीय आहेत. त्यामुळे विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच आज सकाळीच विजय वडट्टीवार यांनी वाल्मीक कराडचा एनकान्टाउंर होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच माध्यमांसोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी बोलताना मांडली.
मुंडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शासकीय कामकाजासंदर्भात मी बावनकुळेंची भेट घेतली. महसूल विभागाचे बीज आणि परळी मतदारसंघातील काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमची भेट झाली अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. यावेळी विरोधकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर मुंडे म्हणाले की, मी राजीनामा का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. मी ना आरोपी आहे किंवा माझा या प्रकरणाशी काही संबंध आहे. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा आणि कोणचा तरी राजीनामा मागायचा या पद्धतीने मागणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
….म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी एकवटणे यात काही चुकीचे नाही
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेले पाहिजे ही मागणी सर्वप्रथम अधिवेशात केल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट सांगितले. हा तपास न्यायालयीनही होणार आहे. तसेच सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन तिन्ही चौकशी सुरू आहेत. ही घटना अत्यंत दुर्देवी असून सर्वपक्षीय नेत्यांनी एकवणे चुकीचे नसल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.





