‘माझ्यावर लग्न करण्यासाठी…’; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बबिताचा खुलासा

Munmun Dutta | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर विशेष चर्चेत असते. या मालिकेतील अनेक कलाकरांनी ही मालिका सोडली.
मात्र मुनमुन आजही या मालिकेसोबत जोडली गेली आहे. मात्र वयाच्या 37 व्या वर्षी देखील तिने अद्याप लग्न केलेले नाही. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. तसेच आईबरोबरच्या नात्याबद्दल देखील तिने सांगितले.
मुनमुन दत्ता म्हणाली, “माझ्या आईचं लग्न खूप लहान वयात झालं आणि तिनं तिचं संपूर्ण आयुष्य आम्हाला वाढवण्यात आणि कुटुंबाची काळजी घेण्यात घालवलं. माझ्यावर लग्न करण्यासाठी आईने कधीही दबाव टाकला नाही. खरं तर ती मला नेहमीच माझ्या करिअर, ट्रिप व माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायला सांगते. जेव्हा गावी लोक माझ्या लग्नाबद्दल विचारतात तेव्हा माझी आई त्यांना अभिमानानं सांगते की, तिला आता लग्न करायचं नाही. ती मला पूर्णपणे साथ देते”.
मुनमुन दत्ताला करिअरच्या सुरुवातीच्या काळात आर्थिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला. “मला घराचं भाडं देण्यासाठी आणि फोटोग्राफरला माझ्या पोर्टफोलिओचे पैसे देण्यासाठी पैशांची गरज होती. माझ्या आईनं वडिलांना न सांगता साठवून ठेवलेले पैसे मला दिले. त्या पैशांमुळे मला भाडं भरण्यास आणि माझं फोटोशूट व ऑडिशन्स करण्यास मदत झाली. त्या एका आधाराने मला खूप काही दिलं,” असे तिने सांगितले. Munmun Dutta |
दरम्यान, मुनमुनने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. फॅशन इंडस्ट्रीत काम केलेल्या मुनमुनने ‘हम सब बाराती’ या मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेतही त्यांच्यासोबत दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल होते. येथूनच त्यांची दिलीप यांच्यासोबत ओळख झाली. दिलीप जोशी यांनी मुनमुनला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आणले होते. यानंतर मुनमुनने साकारलेले बबिता हे पात्र घराघरात पोहचले. Munmun Dutta |
हेही वाचा:





