Political News : तृणमूल काँग्रेस संकटात! आठवडाभरात तिसऱ्या राज्यसभा खासदाराचा राजीनामा; २० हून अधिक लोकसभा खासदारही बंडाच्या तयारीत?
Political News : दिल्लीच्या संसदेतून या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे

Political News : गुरुवारी तृणमूल काँग्रेसलाआणखी एक धक्का बसला. राज्यसभा खासदार प्रकाश चिक बराइक यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एका आठवड्यात राजीनामा देणारे ते पक्षाचे तिसरे खासदार ठरले आहेत. (Political News)
बराइक यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. त्यांच्या बाहेर पडण्याने राज्यसभेतील तृणमूलचे संख्याबळ १० सदस्यांवर आले आहे. (Political News)
पद सोडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, बराईक यांनी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा इन्कार केला. बंगालच्या जनतेचा कौल लक्षात घेऊन मी राजीनामा दिला आहे. आता, मुख्यमंत्री (सुवेंदू अधिकारी) मला जसे सांगतील, मी तसेच करीन. भाजप माझ्यावर कोणताही दबाव टाकत नाही, असे ते म्हणाले. (Political News)
पश्चिम बंगालमधील आदिवासी नेते असलेले बराईक हे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय स्थायी समिती आणि आदिवासी व्यवहार सल्लागार समितीवर कार्यरत होते. (Political News)

Political News : तृणमूल काँग्रेस संकटात! आठवडाभरात तिसऱ्या राज्यसभा खासदाराचा राजीनामा; २० हून अधिक लोकसभा खासदारही बंडाच्या तयारीत?
सोमवारी, राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर राय यांनी पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद असल्याचे कारण देत वरिष्ठ सभागृहाचा राजीनामा दिला आणि नंतर तृणमूल सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला. (Political News)
बुधवारी, राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनीही संसद आणि पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी दिल्लीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली, ज्यामुळे त्या भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशा अटकळींना बळ मिळाले आहे. (Political News)
तृणमूल बंडखोरांची ताकद वाढली (Political News)
काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर खासदार लवकरच सुमारे २० लोकसभा सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र सभापती ओम बिर्ला यांना सादर करण्याची शक्यता आहे. (Political News)
बंडखोर गटाला जादवपूरच्या खासदार सायनी घोष आणि कोलकाता दक्षिणच्या खासदार माला रॉय यांच्यासह २० हून अधिक खासदारांचा पाठिंबा आहे. अबू ताहेर, असित माल, अरूप चक्रवर्ती, कालीपदा सोरेन, जगदीश बसुनिया, प्रसून बॅनर्जी, शर्मिला सरकार, रचना बॅनर्जी, शताब्दी रॉय, बापी हलदार आणि दीपक अधिकारी हे बंडखोर गटात सामील झाले आहेत.
हा बंडखोर गट खरा तृणमूल म्हणून दावा करण्याची तयारी करत आहे. सध्या पक्षात २८ लोकसभा खासदार असून, एक जागा रिक्त आहे. पक्षाच्या ८० पैकी ५८ आमदारांनी (दोन-तृतीयांशपेक्षा जास्त) अधिकृत तृणमूल विधिमंडळ पक्षातून बाहेर पडले आहेत.
पक्षातून काढून टाकलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल विधानसभेत प्रमुख विरोधी गट म्हणून मान्यता मिळवली आहे. तेव्हापासून या बंडखोर गटाने आपली ताकद आणखी वाढल्याचा दावा केला आहे.





