Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीपूर्वीच भाजपचे १० अन् काँग्रेसचे ४ उमेदवार बिनविरोध; वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Rajya Sabha Election : देशातील विविध राज्यांमधील राज्यसभेच्या २४ जागांसाठी आगामी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीपूर्वीच अनेक राज्यांतील निकाल स्पष्ट झाले असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह कर्नाटकातील चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीनंतर रिंगणात केवळ चार उमेदवार उरल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. (Rajya Sabha Election)
कर्नाटकातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, एआयसीसीचे सचिव मन्सूर अली खान आणि काँग्रेसच्या माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. तर भाजपचे एम. नागराज हे देखील बिनविरोध विजयी झाले आहेत. (Rajya Sabha Election)
सुरुवातीला या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र छाननीदरम्यान एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उमेदवारी माघारीच्या अंतिम मुदतीनंतर केवळ चारच उमेदवार उरल्याने मतदानाची गरज भासली नाही. (Rajya Sabha Election)
मतदानाआधीच भाजपचे १० उमेदवार विजयी
दरम्यान, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे. या तीन राज्यांतील एकूण नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (Rajya Sabha Election)
गुजरातमधील चारही जागांवर भाजपचे राजू शुक्ला, मुकेश रथवा, मानसिंग परमार आणि जितेंद्र कांजरिया विजयी झाले. त्यामुळे राज्यसभेत गुजरातचे सर्व ११ प्रतिनिधी भाजपचे असणार आहेत. (Rajya Sabha Election)
राजस्थानमध्ये भाजपचे सतीश पुनिया आणि अलका गुर्जर यांची निवड झाली असून काँग्रेसचे नीरज डांगी देखील बिनविरोध विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशातील तिन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. (Rajya Sabha Election)
वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी (Rajya Sabha Election)
18 जून रोजी मतदान ( Rajya Sabha Election)
दरम्यान, राज्यसभेच्या 24 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी चार, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, झारखंडमध्ये दोन, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. (Rajya Sabha Election)
मीनाक्षी नटराजन प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाबाबत वाद निर्माण झाला आहे. त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Rajya Sabha Election)
या प्रकरणाची सुनावणी १२ जून रोजी होणार असून काँग्रेसने न्यायालयाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यसभेच्या उर्वरित जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असले तरी अनेक राज्यांमध्ये निकाल आधीच स्पष्ट झाल्याने निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे. (Rajya Sabha Election)






