Trinamool Congress : तृणमूल काँग्रेसची मोठी कारवाई ! ‘या’ दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी
कथित पक्षाविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) सोमवारी आपल्या दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Trinamool Congress : कथित पक्षाविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) सोमवारी आपल्या दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. संदिपन साहा आणि ऋतव्रत बॅनर्जी अशी हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्य सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही मिनिटांतच (Trinamool Congress) टीएमसीने या दोन्ही आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला.
राज्य विधानसभेत तृणमूल काँग्रेसने शोभनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली होती. या निवडीच्या प्रक्रियेत बनावट स्वाक्षरी झाल्याची तक्रार या दोन्ही आमदारांनी दाखल केली होती. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत या तक्रारीचा उल्लेख केल्यानंतर टीएमसीने तातडीने ही पावले उचलली.
तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या स्वाक्षरीने दोन्ही आमदारांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आलेले असतानाही, तुम्ही पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाने (Trinamool Congress) बोलावलेल्या बैठकांना सातत्याने गैरहजर राहिलात आणि पक्षाविरोधी कारवायांमध्ये गुंतलात. तसेच, पक्षाच्या हिताला बाधा पोहोचवणारी विधाने आणि कृत्ये केल्याचेही समोर आले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून तृणमूल काँग्रेसच्या सक्षम प्राधिकरणाने संदिपन साहा आणि ऋतव्रत बॅनर्जी यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.






