चिंबळी- चिंबळी गावठाण हद्दीतून राजे शिवछत्रपती चौक ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी व पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून ते अनेक ठिकाणी ते साचले असल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनचालकांची कसरत होत असून पायी चालणेही जिकरीचे झाले आहे.
दरम्यान, इंद्रायणी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत अत्यंविधी व दशक्रिया विधीसाठी जाताना ग्रामस्थांना चिखल तुडवत जावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.