Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागाचा संघ जाहीर! तिलक वर्मा सांभाळणार धुरा

Duleep Trophy 2025 Updates : देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप ट्रॉफी २०२५ च्या स्पर्धेतील दक्षिण विभागाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व २२ वर्षीय भारतीय खेळाडू तिलक वर्मा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तिलकने नुकतेच इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून खेळताना चार डावांमध्ये १००, ५६, ४७ आणि ११२ धावांची प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने चार वनडे आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत तो दक्षिण विभागाचे नेतृत्व करेल.
१६ सदस्यीय संघ जाहीर –
१६ सदस्यीय संघात केरळच्या चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीन, एमडी निधीश, बेसिल एनपी आणि सलमान निजार यांचा समावेश आहे. मोहम्मद अझरुद्दीन याला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तमिळनाडूच्या नारायण जगदीशन आणि आर. साई किशोर यांनाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याचाही संघात समावेश आहे.
दक्षिण विभागाच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व भारत आणि कर्नाटकचा वेगवान गोलंदाज व्यासक विजयकुमार करेल. याशिवाय कर्नाटकचा उत्कृष्ट फलंदाज आर. समरण, ज्याने गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात ५१६ धावांसह कर्नाटककडून सर्वाधिक धावा केल्या होत्या, त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : स्टोक्सचा वेगवान चेंडू लागताच जोरात किंचाळला गिल, VIDEO होतोय व्हायरल
२८ ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीला सुरूवात –
यंदा दुलीप ट्रॉफी २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि ती प्रादेशिक स्वरूपात खेळवली जाणार आहे. यात एकूण सहा संघ सहभागी होतील: दक्षिण विभा, उत्तर विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, मध्य विभाग आणि ईशान्य विभाग. ही चार दिवसीय स्पर्धा बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलन्स मैदानावर आयोजित केली जाईल. क्वार्टर फायनल सामन्यांमध्ये उत्तर विभागाचा सामना पूर्व विभागाशी होईल, तर मध्य विभागाचा सामना ईशान्य विभागाशी होईल. दक्षिण विभाग आणि पश्चिम विभागाचा यांनी थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : राहुल-गिलने मँचेस्टरमध्ये रचला इतिहास, मोडला २३ वर्षांपूर्वीचा भागीदारीचा विक्रम
दक्षिण विभाग संघ :
तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उपकर्णधार), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीसन, टी. विजय (आंध्र), आर. साई किशोर, तनय त्यागराजन, विशाक विजयकुमार, एमडी निधिसिंग, निधिसिंग, एसपी गुरखे, एस.एन. कौठणकर. स्टँड बाय: मोहित रेडकर, आर. स्मरण, अंकित शर्मा, एडन ऍपल टॉम, आंद्रे सिद्धार्थ, शेख रशीद.





