IND vs ENG : स्टोक्सचा वेगवान चेंडू लागताच जोरात किंचाळला गिल, VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG Shubman Gill Injured Video Viral : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने सातत्याने उत्कृष्ट फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला आहे. या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांना गिलला त्रास देण्याच्या संधी फारच कमी मिळाल्या. पण मँचेस्टर कसोटी सामन्यात भारतीय कर्णधाराला केवळ त्रासच झाला नाही, तर दुसऱ्या डावात त्याला अशा चेंडूचा सामना करावा लागला, ज्याने त्याला तीव्र वेदना दिल्या आणि तो किंचाळला. ही वेदना त्याला कर्णधार बेन स्टोक्सचा वेगवान चेंडू लागल्याने झाल्या.
मँचेस्टरमधील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सामना वाचवण्यासाठी झगडत होता, तेव्हा कर्णधार शुबमन गिलने संघाची जबाबदारी स्विकारली. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू झाला आणि गिलला पहिल्याच षटकात फलंदाजीसाठी उतरावे लागले. गिलने केएल राहुलसोबत मिळून डाव सावरला आणि भारतीय संघाला २०० धावांच्या जवळ नेले. मात्र, पाचव्या दिवशी राहुल लवकर बाद झाला, तरी गिलने मैदानावर टिकून राहत लढा दिला.
स्टोक्सच्या चेंडूवर गिलला झाली दुखापत –
Taking hits, but still standing – India’s story in Manchester💪#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/racbGv9y2P
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 27, 2025
दरम्यान, गिलसमोर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स होता, जो सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना जखमी झाला होता आणि त्रास सहन करत होता. यामुळे स्टोक्स चौथ्या दिवशी गोलंदाजी करू शकला नाही. पण पाचव्या दिवशी स्टोक्सने येताच गोलंदाजी सुरू केली आणि त्रास देण्यास सुरुवात केली. याचवेळी स्टोक्सचा एक चेंडू गुड लेंथवरून अचानक खूप वेगाने उसळला आणि गिलला त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चेंडू आधी त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला लागला आणि नंतर हेल्मेटवर जोरात आदळला.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलने झळकावले ऐतिहासिक शतक, सचिननंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
चेंडू लागल्याने गिलला तीव्र वेदना झाल्या आणि त्याने तात्काळ बॅट टाकली आणि हात झटकायला सुरुवात केली. यानंतर हेल्मेट काढून खेळपट्टीपासून दूर गेला. गिलची ही अवस्था पाहून भारतीय संघाचे फिजिओ धावत मैदानावर पोहोचले आणि त्याच्या हाताची तपासणी करू लागले. त्यांनी गिलच्या हातावर पेनकिलर स्प्रे मारला, ज्याने वेदना कमी होतात. तरीही, गिलला वेदनांचा त्रास होत राहिला, पण त्यांनी त्या वेदनेसह खेळ सुरू ठेवला.
हेही वाचा – IND vs ENG : राहुल-गिलने मँचेस्टरमध्ये रचला इतिहास, मोडला २३ वर्षांपूर्वीचा भागीदारीचा विक्रम
दुखापतही गिलला शतक झळकावण्यापासून रोखू शकली नाही –
या दुखापतीचा परिणाम गिलच्या जिद्दी खेळावर झाला नाही. त्याने या सामन्यात २२८ चेंडूंमध्ये आपले नववे कसोटी शतक पूर्ण केले. पहिले सत्र संपण्यापूर्वी तो १०३ धावांवर बाद झाला, पण या खेळीच्या जोरावर त्याने मालिकेत ७०० धावांचा टप्पा ओलांडला. आता तो ७२२ धावांसह इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज ठरला आहे.





