खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त

खडकी: खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढील दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली.
१९१३ मध्ये स्थापन झालेल्या खडकी शिक्षण संस्थेने १९८३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष ॲड. एस. के. जैन आणि चिटणीस स्व. ॲड. चंद्रकांत छाजेड यांच्या प्रयत्नांनी टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाने नुकताच माणिक महोत्सव साजरा केला, असे गोयल यांनी सांगितले.
संस्थाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास साधण्यात आला आहे. स्वायत्त दर्जामुळे या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी. डेटा सायन्स, बी.एस्सी. इंटेरियर डिझाईन, बी.एस्सी. सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक, बी.एस्सी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बी.एस्सी. ॲनिमेशन, बी.ए. इन सिव्हील सर्व्हिसेस आणि बी.ए. इन नाट्यशास्त्र हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी दिली.
या प्रसंगी सचिव आनंद छाजेड, उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, डॉ. सुचेता दळवी, प्रा. राजेंद्र लेले, प्रा. जुगल नाईक, डॉ. निलेश काळे, डॉ. अविनाश कोल्हे, परीक्षा विभागप्रमुख डॉ. डी. एम. मुपडे, डॉ. नागेंद्र जंगम, डॉ. प्रकाश पांढरपिसे, डॉ. महेश बेंडभर आणि कार्यालय अधीक्षक लक्ष्मण डामसे उपस्थित होते.





