Cocktail 2 Poster : ‘ती’ धमाल पुन्हा पाहता येणार! Cocktail 2 चा फर्स्ट लूक समोर; 18 तारखेचा उल्लेख करण्याचं कारण काय?
Cocktail 2 Poster : बहुचर्चित कॅाकटेल २ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला असून, यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Cocktail 2 Poster : २०१२ मध्ये कॅाकटेल चित्रपट झाला होता. चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर चांगली कामगिरी केली. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल कॅाकटेल २ चाहत्यांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाविषयीच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच चित्रपटाचे पहिले पोस्टर म्हणजेच फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले आहे.
या चित्रपटातील स्टारकास्टर अगोदरच रिव्हील करण्यात आली होती. त्यानुसार शाहिद कपूर , रश्मिका मंदाना आणि कृती सेनन प्रमुख भूमिकेत आहेत. सोशल मीडियावर फर्स्ट लूकची जोरदार चर्चा रंगली असून, चित्रपटाच्या टीझरकडे चाहत्यांचे लक्ष आहे. या पोस्टरमध्ये टीझर कधी येणार याविषयी देखील सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Ban vs Pak 2nd ODI: विचित्र रनआऊट! सलमान आघा संतापला अन्…, पाकिस्तान-बांगलादेश सामन्यामधील व्हिडिओ व्हायरल
हे पोस्टर शेअर करताना तिन्ही कलाकारांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चित्रपटाबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी १८ मार्चला थिएटरमध्ये जरूर या. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. Cocktail 2 Poster
फर्स्ट लूकमध्ये तिघेही कारने बीच ट्रिपला जाताना दिसत आहेत, त्यामुळे चित्रपटाचा मूड मस्तीपूर्ण असल्याचे दिसत आहे. रश्मिका मंदाना व्हाइट ड्रेस आणि सनग्लासेसमध्ये कारमधून व्हिडिओ शूट करताना दिसते. दुसरीकडे शाहिद कपूर रंगीबेरंगी शर्टमध्ये दिसत असून त्यांच्या मागे मावळता सूर्य दिसतो. तर कृति सेननच्या पोस्टरमध्ये तिचे पाय दिसत असून त्यावर ‘Catch the sea’ असा टॅटू दिसत आहे. Cocktail 2 Poster

Cocktail 2
चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदाजनिया करत आहेत. चित्रपटाचा टीझर १८ मार्चला दिग्दर्शक आदित्य धरच्या धुरंधर: द रिवेंज चित्रपटासोबत दाखवण्यात येणार असल्याची माहिती पोस्टरसोबत देण्यात आली आहे. तर कॅाकटेल २ हा चित्रपट १९ जून या दिवशी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
कॅाकटेलच्या (Cocktail 2 ) पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. पहिल्या भागात सैफ अली खान, दीपिका पदुकोन आणि डायना पेंटी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता दुसऱ्या भागातील स्टारकास्ट नवीन कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Cocktail 2 Poster
हेही वाचा : Beauty Tips: ४० नंतरही त्वचा दिसेल तरुण! मेकअपपूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय





