Mouni Roy : अखेर चर्चा खरी ठरली! मौनी रॅायने स्वतः दिली घटस्फोट झाल्याची कबुली; चार वर्षांचा सुखी संसार मोडला
Mouni Roy : मौनी आणि सूरज यांनी संयुक्त निवेदन जारी करून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

Mouni Roy : ‘नागिन’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री मौनी रॅाय तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ती आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मौनी आणि सूरज यांनी संयुक्त निवेदन जारी करून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ करणं, दोघांचे एकत्रित असेलेले फोटो डिलीट करणं आणि सोशल मीडियावर एकमेकांपासून अलिप्त राहणं यावरुन दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचे बोलले जात होते.
अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. चार वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी वैवाहिक जीवनाच्या नात्याला फुलस्टॅाप देण्याचा निर्णय घेतला आहे.
मौनी रॅायने (Mouni Roy) सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर करत परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करत हा काळ खाजगीरित्या हाताळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच मौनीने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून माध्यमं आणि नेटकऱ्यांना त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे.
मौनीने पोस्टमध्ये लिहिलं की, “आम्ही सर्वांना नम्र विनंती करतो की आम्हाला आमचा एकांत आणि मान द्यावा. माझ्या किंवा सूरजच्या संदर्भात कोणत्याही खोट्या बातम्या पसरवू नयेत. या कठीण काळात आम्ही शांतता आणि प्रायव्हसीची अपेक्षा करतो.”
पोस्टमध्ये दोघांच्याही वतीने हे निवेदन करण्यात आलं असून, प्रसारमाध्यमांनी त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करू नये, असंही नमूद करण्यात आलं आहे. तसेच ट्रोलिंग आणि निगेटिव्ह कमेंट्स टाळण्यासाठी त्यांनी पोस्टचं कमेंट सेक्शनही बंद ठेवलं आहे.
२०२२ मध्ये लग्न आणि २०२६ ला विभक्त (Mouni Roy)
मौनी आणि सूरज यांनी 2022 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं होतं. लग्नाआधी दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं होतं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघंही सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावर एकत्र दिसत नसल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं होतं.
मौनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर 2024 नंतर सूरजसोबतचे कोणतेही फोटो किंवा पोस्ट दिसल्या नाहीत. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना अनफॅालो केलं.






