Cocktail 2 poster : २०१२ मध्ये कॅाकटेल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हटक्या कथानकामुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. गेल्या काही वर्षांपासून कॅाकटेल चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता कॅाकटेल चित्रपटाच्या सिक्वलचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. कॅाकटेलच्या पहिल्या भागात अभिनेता सेफअली खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेत्री डायना पेंटी झळकली होती. मैत्रीवर आधारित असणाऱ्या या चित्रपटात या तिन्ही कलाकारांच्या अफलातून परफॅार्म्सने प्रेक्षकांना थक्क करून सोडले. चित्रपटाच्या कथानकासोबतच असणारी सगळीच गाणी हिट ठरली. ३० कोटी रुपयांच्या कमी बजेटवर तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली. आता दुसऱ्या भागासाठी अर्थात सिक्वलसाठी चाहते उत्सुक आहेत. कॅाकटेल दोनच्या पोस्टरमधून चित्रपटातील आधीच्या कलाकारांची जागा आता दुसऱ्या कलाकारांनी घेतली आहे. अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री क्रिती सॅनेन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानी हे कलाकार कॅाकटेल २ मध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचा सिक्वल तब्बल १३ वर्षांनंतर चाहत्यांच्या भेटीसाठी येण्यास सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये शाहिद, क्रिती आणि रश्मिका हे तिघेही एका समुद्र किनाऱ्यावर मनोसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. पोस्टरमधून चित्रपट प्रदर्शनाची नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी पोस्टरमध्ये कॅाकटेल राऊंड २ असे लिहिले असून, हा चित्रपट अॅागस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अधिकृतरित्या चित्रपटाचे पोस्टर टीमकडून शेअर करण्यात आलेले नाही. हेही वाचा : “मुलं जन्माला घालणं, स्वयंपाक करणं…”! उत्तर भारतीय मुलींबद्दल द्रमुक खासदाराच्या विधानाने गोंधळ ; भाजपचा हल्लाबोल