Ban vs Pak 2nd ODI: विचित्र रनआऊट! सलमान आघा संतापला अन्…, पाकिस्तान-बांगलादेश सामन्यामधील व्हिडिओ व्हायरल
Ban vs Pak 2nd ODI: सलमान आघाने रागात मैदानावर ग्लोव्हज व हेल्मेट काढून फेकलं.

Ban vs Pak 2nd ODI: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामान्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू सलमान अली आघा विचित्र पद्धतीने रनआउट झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सलमान आगासोबत नेमकं काय घडलं? Ban vs Pak 2nd ODI
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानच्या डावात सलमान आगाचा रनआउट हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानी डावातील 39व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली.
त्या वेळी मेहदी हसन मिराज गोलंदाजी करत होता, तर मोहम्मद रिजवान स्ट्राईकवर फलंदाजी करत होता. त्याने चेंडू गोलंदाजाच्या उजव्या दिशेला टोलवला आणि मिराजने पायाने तो चेंडू थांबवला. Ban vs Pak 2nd ODI
दरम्यान, नॉन स्ट्रायकरच्या टोकावर असलेला आघा त्याच्या क्रीजच्या बाहेर होता आणि मिराज व आघाची टक्कर झाली. चेंडू सलमानच्या बॅटला लागून मेहदी हसनच्या हातात गेला. त्या क्षणी दोघांमध्ये धडकही झाली. सलमानला वाटले की चेंडू आता खेळात राहिलेला नाही, त्यामुळे तो चेंडू उचलण्यासाठी खाली वाकला.
Crucial moment! Mehidy Hasan Miraz removes Salman Agha with a brilliant run-out. ⚡🏏#BCB #Cricket #Bangladesh #Pakistan #ODI pic.twitter.com/N0inKkZVwz
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 13, 2026
मात्र त्याआधीच मेहदी हसनने चेंडू उचलून थेट स्टंप्सवर फेकला आणि रनआउटची अपील केली. नियमांनुसार तिसऱ्या पंचांनी सलमान आगाला बाद घोषित केले. हा निर्णय लागल्यानंतर सलमान काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की बांग्लादेशी खेळाडूंनी दाखवलेल्या खेळभावनेबद्दल तो नाराज आहे.
त्यानंतर सलमान आघाने रागात मैदानावर ग्लोव्हज व हेल्मेट काढून फेकलं. सलमानला पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवान यालाही बांगलादेशच्या खेळाडूंशी मैदानावर वाद घालताना पाहण्यात आले. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश १-० ने आघाडीवर आहे. Ban vs Pak 2nd ODI:
हेही वाचा:





