Mumbai Accident : मुंबईत कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Mumbai Accident ; मुंबईतील नव्याने सुरू झालेल्या कोस्टल रोडवर (Coastal Road) रविवारी पहाटे ५:२० च्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला.

Mumbai Accident : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पहाटे ५.२० च्या सुमारास घडली. ही लक्झरी कार मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने अतिशय वेगाने जात होती. (Mumbai Accident)
कोस्टल रोड नियंत्रण कक्षानुसार, लाला लजपत राय कॉलेजसमोरील लोटस जेटीजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला. कारमधील चौघांनाही तातडीने जवळच असलेल्या महापालिकेच्या नायर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यापैकी तिघांना मृत घोषित करण्यात आले. (Mumbai Accident)
मृतांपैकी दोघांची ओळख शनाय गज्जल (२१) आणि धिर्य सेठ (१७) अशी पटली आहे. तिसऱ्या मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. (Mumbai Accident)
चौथा प्रवासी, ज्याचे वय अंदाजे २० वर्षे आहे आणि ओळख अद्याप पटलेली नाही, तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याला रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. या अपघताची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Mumbai Accident)
Mumbai Accident : मुंबईमध्ये भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात; चौघांचा मृत्यू





