Mumbai Accident : मुंबईमध्ये भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मुंबईमधील कुर्ला भागात एलबीएस रोडवर हा अपघात झाला आहे.
कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या 10 ते 12 जणांना चिरडलं आहे, त्यात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसचा ड्रायव्हर हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.





