हडपसर पोलिसांकडून तांब्याचे पाईप चोरणारे तिघे जेरबंद

पुणे : गोडाऊन मधून तांब्याचे पाईप चोरी करणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसानी अटक करून त्यांच्याकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या महिलेसही पोलिसांनी अटक केली आहे.
तुषार संजय खलसे (20 ), अक्षय महिंद्र शिंदे (18 ) आणि आरिफ ईस्तेआक शेख (18 तिघे रा. रामटेकडी हडपसर) अशी तिघा आरोपींचे नावे आहेत. या तिघांसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या महिले विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर परिसरातील एका गोडाऊन मधून तांब्याच्या पाईपची चोरी झाली होती. हडपसर पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रफीत तपासून पहिल्या असता त्यावरून रामटेकडी येथील अंधशाळेजवळून वरील तिन संशयित आरोपीना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गोडाऊन मध्ये चोरी केली आणि तो माल कमर अझीम शेख (वय , रा आनंद नगर रामटेकडी) हिच्या स्क्रॅप सेंटरवर विक्री केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीसानी महिलेला अटक करीत चोरलेला माल जप्त केला.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक हिमायल जोशी, सहायक फौजदार युसुफ पठाण, पोलिस कर्मचारी रमेश साबळे, राजेश नवले, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, विनोद शिवले, अकबर शेख शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.





